जेव्हा हेमा मालिनी यांच्या डिलीव्हरीवेळी धर्मेंद्र यांनी बुक केलं होतं पूर्ण हॉस्पिटल

जेव्हा हेमा मालिनी यांच्या डिलीव्हरीवेळी धर्मेंद्र यांनी बुक केलं होतं पूर्ण हॉस्पिटल

त्या रुग्णालयात एकूण १०० खोल्या होत्या. याच रुग्णालयात हेमा आणि धर्मेंद्र यांच्या पहिल्या मुलीचा ईशा देओलचा जन्म झाला.

  • Share this:

मुंबई, ०५ एप्रिल- ड्रिमगर्ल नावाने आजही ओळखल्या जाणाऱ्या बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी या ७० च्या दशकातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री होत्या. त्यांना बॉलिवूडमध्ये पहिली ओळख निर्माता- दिग्दर्शक आणि राजकपूर यांच्या सपनों के सौदागर सिनेमातून मिळाली. याच सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान त्यांना ड्रिमगर्ल म्हणून ओळख मिळाली. हेमा मालिनी आणि धर्मेंद यांच्या जोडीची चर्चा सराफत सिनेमापासून सुरू झाली. यानंतर आलेल्या शोले (१९७५) सिनेमामुळे तर ही जोडी कमालिची हिट झाली. प्रेक्षकांनी हा सिनेमा अक्षरशः डोक्यावर घेतला. यानंतरही दोघांनी अनेक सिनेमांत एकत्र काम केलं. अखेर दोघांनी २१ ऑगस्ट १९७९ मध्ये लग्न केलं.

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्याशी निगडीत अनेक किस्से तुम्हाला माहीत असतील. पण आज आम्ही तुम्हाला जो किस्सा सांगणार आहोत तो कदाचित तुम्ही याआधी कधीच ऐकला नसेल. २०१२ मध्ये झी टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या 'जीना इसी का नाम है' शोमध्ये हेमा यांनी याबद्दल सांगितले होते. जेव्हा हेमा मालिनी गरोदर होत्या तेव्हा याबद्दल कोणाला कळू नये म्हणून धर्मेंद्र यांनी संपूर्ण रुग्णालय बूक केलं होतं. जेव्हा हेमा आणि धर्मेंद्र यांना जेव्हा पहिलं आपत्य होणार होतं याबद्दल बाहेरील जगाला काहीच माहीत नव्हतं. हेमा आई होणार असल्याची वार्ता कोणाला कळावी असं धर्मेंद्र यांना अजिबात वाटत नव्हतं. मुंबईतील मालाड येथे डॉ. दस्तूर (आहुरा नर्सिंग होम) यांचं रुग्णालय होतं. त्या रुग्णालयात एकूण १०० खोल्या होत्या. याच रुग्णालयात हेमा आणि धर्मेंद्र यांच्या पहिल्या मुलीचा ईशा देओलचा जन्म झाला.

दरम्यान, सध्या लोकसभा निवडणुकांमुळे हेमा मालिनी चर्चेत आहेत. मथुराच्या खासदार असलेल्या हेमा यांना भाजपने पुन्ह एकदा तिकीट दिलं आहे. हेमा यांनी त्यांचा प्रचार सुरू केला असून नवनवीन पद्धतीने त्या निवडणुकीचा प्रचार करत आहेत. त्यांना शेतात ट्रॅक्टर चालवतानाही पाहण्यात आलं तर शेतातली इतर कामं करतानाही पाहण्यात आलं आहे.

VIDEO : आढळराव पाटील आणि गिरीश बापटांच्या भेटीबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...

First published: April 5, 2019, 8:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading