दुर्दैवी! लग्नासाठी घरी आलेल्या जवानाचा मृत्यू, दुचाकीवरून जाताना कारने उडवलं

दुर्दैवी! लग्नासाठी घरी आलेल्या जवानाचा मृत्यू, दुचाकीवरून जाताना कारने उडवलं

रस्त्यावरून जात असताना जवानाचा अपघात झाला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. पण रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला आहे.

  • Share this:

कांगडा (हिमाचल प्रदेश), 08 ऑक्टोबर : लग्नासाठी घरी आलेल्या लष्करातील जवानाचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संपूर्ण देशाची रक्षा करणाऱ्या जवानाचा असा प्रकारे मृत्यू झाल्यामुळे शोक व्यत्क होत आहे. रस्त्यावरून जात असताना जवानाचा अपघात झाला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. पण रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला आहे.

लग्नासाठी आले होते घरी

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस स्टेशन शाहपूर अंतर्गत रायटबाजार येथे रस्ता अपघातात लदवाडाचा सैनिक जखमी झाला. मंगळवारी सकाळी या सैनिकाचा मृत्यू झाला. 25 वर्षाचा सिंकदर यांना टांडा मेडिकल कॉलेजमध्ये आयसीयूमध्ये दाखल केलं होतं. सिकंदर बठिंडा इथे तैनात होते आणि 15 दिवसांच्या सुट्टीवर घरी आले होते. 14 ऑक्टोबरला ते कर्तव्यावर परत येणार होते. पण त्याआधीच त्यांनी सगळ्यांचा निरोप घेतला. त्यांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. हिमाचल प्रदेशच्या कांगडा जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे.

इतर बातम्या - साईबाबांच्या शिर्डीत काय आहे विजयादशमीचं महत्त्व? वाचा सविस्तर...

दुचाकी आणि कारमध्ये झाली धडक

शनिवारी रायट बाजारातून सिकंदर दुचाकीवरुन जात होते. त्यादरम्यान त्यांची दुचाकी वाहनास धडकली. यामुळे ते गंभीर जखमी झाले. लोकांनी त्यांना शाहपूर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं. पण मंगळवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. सिकंदरचे वडील हरबंस लाल शेतकरी आहेत. आणि चार वर्षांपूर्वी सिकंदर सैन्यात भरती झाले होते. तरुण शिपायाच्या मृत्यूमुळे लाडवाडा व आसपासच्या भागात शोककळा पसरली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 8, 2019 11:49 AM IST

ताज्या बातम्या