मुंबई, 13 ऑगस्ट : आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी आहे. या तिथीचं औचित्य साधून आज धनगर समाज राज्यभरात रस्ते आणि महामार्गांवर रास्ता रोको आंदोलनाच्या स्वरूपात ही तिथी साजरी करणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात गावोगावी सकाळी ११ वाजता हे आंदोलन सुरू होईल. धनगर समाज संघर्ष समितीच्या परंपरेला अनुसरून हे आंदोलन 'शांततापूर्ण' पद्धतीनेच करण्यात येईल असं धनगर समाजाकडून करण्यात आसं आहे.
या निर्धारावर धनगर समाज संघर्ष समिती ठाम आहे, शासनाने धनगर समाजास गृहीत धरू नये, अशी भुमिका धनगर समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्यने घेतली आहे. त्यामुळे आता आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज रस्त्यावर उतरला आहे. पण शांततेत पुकारलेल्या या आंदोलनाला कोणतंही हिसंक वळण लागता कामा नये ही भावना सगळीकडून व्यक्त होत आहे.
धनगर समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य च्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची १० ऑगस्ट रोजी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली. धनगर आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यानी आश्वासित केले. संपूर्ण बैठक सकारात्मक झाली असली तरी सरकार कडून होत असलेल्या दिरंगाई मुळे धनगर समाजात असंतोष आहे.
सरकारने ने धनगर आरक्षणास प्राधान्य द्यावे. आता उशीर करून चालणार नाही धनगरांचा अंत पाहू नये असे ठणकावून सांगण्यासाठी १३ आँगस्ट रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी संपूर्ण महाराष्ट्रात रस्ते व महामार्गावर साजरी करून रास्ता रोको आंदोलनाच्या स्वरूपात केली जाईल.
संपूर्ण महाराष्ट्रात गावोगावी व प्रत्येक ठिकाणी सकाळी ११ वाजता हे आंदोलन सुरु होईल. धनगर समाज संघर्ष समितीच्या परंपरेला अनुसरून हे आंदोलन देखील मोठ्या प्रमाणावर व संपूर्ण शक्तीनिशी मात्र ' शांततापूर्ण ' पद्धतीनेच करण्यात येईल. या निर्धारावर धनगर समाज संघर्ष समिती ठाम आहे, शासनाने धनगर समाजास गृहीत धरू नये, अशी भुमिका धनगर समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य ने घेतली आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा