काही दिवसांत धनगर आरक्षणाबाबत गुड न्यूज मिळणार - महादेव जानकर

काही दिवसांत धनगर आरक्षणाबाबत गुड न्यूज मिळणार - महादेव जानकर

शुक्रवारी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत आरक्षणावर सकारात्मक निर्णय घेण्यात आला असल्याचं पशुसंवर्धन मंत्री आणि रासप अध्यक्ष महादेव जानकर यांनी स्पष्ट केलं आहे.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, प्रतिनिधी

मुंबई, 14 डिसेंबर: सरकार दरबारी आता धनगर आरक्षणासाठी वेगानं काम सुरू झालं आहे. शुक्रवारी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत आरक्षणावर सकारात्मक निर्णय घेण्यात आला असल्याचं पशुसंवर्धन मंत्री आणि रासप अध्यक्ष महादेव जानकर यांनी स्पष्ट केलं आहे. काही वेळेआधीच मुख्यमंत्री आणि जानकर यांच्यातली बैठक पार पडली.

काही दिवसांत धनगर आरक्षणाबाबत गुड न्यूज मिळणार आहे. आरक्षणासाठी मुख्यमंत्री धनगर आमदारांसह दिल्लीला जाणार आहेत. मंत्री नव्हतो तेव्हा माहिती नव्हतं पण आरक्षणासंदर्भातील तांत्रिक बाजू कळत असल्याची कबुलीही जानकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

धनगर आरक्षणावर काय म्हणाले महादेव जानकर?

"धनगर आरक्षणाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून सकारात्मक अहवाल राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. त्याचबरोबर आदिवासी आरक्षणाला कोणताही धक्का न लावता धनगर आरक्षण देणार"

दरम्यान, धनगर आरक्षणाबाबत महादेव जानकर यांची एक ऑडिओ क्लिप प्रचंड व्हायरल झाली होती. 'मला धनगर आरक्षणापेक्षा पक्ष महत्त्वाचा आहे, तुम्ही आधी पक्षाचं काम करा,' असं त्या ऑडिओ क्लिपमध्ये जानकर एका तरुणाला म्हणत होते. त्यानंतर आता सूर बदलत धनगर आरक्षणावर आधी काम करणार असल्याचं जानकर म्हणाले आहेत.

धनगर आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यात चर्चा

मराठा आरक्षण दिल्यानंतर पुढच्या अधिवेशनापर्यंत धनगर आरक्षणाचा मुद्दादेखील मार्गी लावणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. त्यानंतर त्यांनी गुरुवारी पंतप्रधान मोदी यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली आहे.

पंतप्रधान मोदी धनगर आरक्षणाबाबत सकारात्मक असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आरक्षण देण्यासाठी सरकार दरबारी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही.

रस्सीखेच खेळात अती जोर लावल्याने विद्यार्थ्याने गमावले प्राण, अंगावर काटा आणणारा LIVE VIDEO

First published: December 14, 2018, 3:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading