परळीतील व्यापारी मारहाण प्रकरणी गय केली जाणार नाही, धनंजय मुंडेंचं ट्वीट

परळीतील व्यापारी मारहाण प्रकरणी गय केली जाणार नाही, धनंजय मुंडेंचं ट्वीट

दडपशाही आणि दादागिरी सहन केली जाणार नाही याविरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली. तसेच व्यापारी महासंघाने बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. आरोपींची गय केली जाणार नाही असं ट्विटही धनंजय मुंडेचे यांनी केलं आहे.

  • Share this:

परळी, 18 फेब्रुवारी : परळी शहरातील व्यापारी मारहाण प्रकरणात व्यापाऱ्यांनी परळी बंदची हाक दिली. यात परळी शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी रस्त्यावर उतरून आरोपींना अटक करण्याची मागणी करत पोलिसांना निवेदन दिले. यावेळी दडपशाही आणि दादागिरी सहन केली जाणार नाही याविरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली. तसेच व्यापारी महासंघाने बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. आरोपींची गय केली जाणार नाही असं ट्विटही धनंजय मुंडेचे यांनी केलं आहे.

'परळीतील व्यापारी मारहाण प्रकरणी कोणाचीही गय केली जाणार नाही. २४ तासांच्या आत आरोपींना अटक केली असून ३०७ कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. अशा घटनेत आरोपींवर कडक कारवाई करण्याची सूचना मी @BEEDPOLICE  यांना केली आहे.व्यक्तिगत भांडणात कृपया माझे नाव जोडण्याचा प्रयन्त करू नये ही विनंती' असं ट्वीट धनंजय मुंडे यांनी केलं आहे.

बंदचं आवाहन करताना मोठ्या संख्येने सामान्य नागरिक व्यापारी रस्त्यावर उतरले होते. काल परळी शहरात दिवसाढवळ्या अमर देशमुख या व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. यामध्ये गंभीर जखमी असलेला अमर देशमुख यांच्यावर आंबेजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, कालच्या घटनेनंतर परळीमधील सामान्य नागरिक व व्यापारी यामधे भीतीचे वातावरण होते.

यामुळे  मारहाण करणाऱ्या आरोपींना तत्काळ अटक करा अशी मागणी केरण्यात येत आहे. आज परळी शहरात तणावाचे वातावरण पाहायला मिळालं. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून आरोपीला अटक करण्यासाठी पथक रवाना करण्यात आल्याचे संभाजी नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 18, 2020 01:49 PM IST

ताज्या बातम्या