'7 वर्षात राजकारणासाठी माझी 100 एकर जमीन गेली'

'7 वर्षात राजकारणासाठी माझी 100 एकर जमीन गेली'

' 7 वर्ष झालं या राजकारणासाठी 100 एक्कर जमीन विकावी लागली. अन् तुम्ही म्हणता आम्ही तोडपाणी केली.' अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंवर टीका केली.

  • Share this:

बीड, 09 एप्रिल : '7 वर्षाच्या राजकारणात माझी शंभर एक्कर जमीन गेली' अशी कबूली विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली आहे. तोडपाणीच्या आरोपावर बोलतांना धनंजय मुंडे यांनी उत्तर दिलं. यावेळी पंकजा मुंडेंना त्यांनी जाहीर आवाहन केलं.

'एक काम करा ना ताई कुणी कशात तोडपाणी केली याची साधी सोपी चौकशी करा. जर विरोधी पक्षनेता म्हणून मी तोडपाणी केली असले तर तुम्हीही राज्याच्या सत्तेतील मंत्री आहात. तुमच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करण्याचे अधिकार तुम्हाला आहेत. काय चौकशी करायची असेल ती करा' असं म्हणत धनंजय मुंडे पुढे म्हणाले की, 'तुमच्याही चिक्कीची आणि मोबाईलची चौकशी माझ्या अध्यक्षतेखाली होवू द्या. एकदाच दूध का दूध और पाणी का पाणी होवू द्या.

' 7 वर्ष झालं या राजकारणासाठी 100 एक्कर जमीन विकावी लागली. अन् तुम्ही म्हणता आम्ही तोडपाणी केली.'  अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंवर टीका केली.

ते पुढे म्हणाले की, 'तुम्ही लहान लेकरांच्या चिक्कीत खाता मोबाईलमध्ये खाता मग मुंडे साहेबांचा वारसा हाच चालवता का?' असा प्रश्नच धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेनां विचारला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि महा आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ शिरूर कासार इथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

भावाच्या भरलेल्या ताटात खडे टाकायचं काम कोणी केलं? - धनंजय मुंडे

आम्ही शरीरिक वजन कमी केलं. पण राजकीय वजन वाढवलं आहे. राजकीय वजन आम्ही स्वकर्तृत्वाने वाढवलं पण भावाच्या भरलेल्या ताटात खडे टाकायचं काम कोणी केलं' असा प्रश्न उपस्थिती करत त्यांनी पंकजा मुंडेंवर निशाना साधला.

VIDEO : 'आमच्याकडे ना मोदीवाले आले, ना राहुलवाले'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 9, 2019 06:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading