धनंजय मुंडेंची डोकेदुखी वाढली, पाणी प्रश्नावरून पक्षांतर्गत मतभेद चव्हाट्यावर

धनंजय मुंडेंची डोकेदुखी वाढली, पाणी प्रश्नावरून पक्षांतर्गत मतभेद चव्हाट्यावर

नगरसेवक दिपक देशमुख आणि संजय फड यांनी पुन्हा तिकीट नाही दिलं तरी हरकत नाही. पण पाण्यातील पाप सहन करणार नाही असा पवित्रा घेतं नगरपालिकेविरोधात आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे.

  • Share this:

बीड, 14 मे : परळी नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता आहे. ही सत्ता धनंजय मुंडे यांच्या ताब्यातील आहे. मात्र, या नगर पालिकेत पाणी प्रश्नावरून राष्ट्रवादीच्या नगर सेवकाने नगरपालिकेविरोधात बंडखोरी केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याची चर्चा आहे.

नगरसेवकाच्या बंडखोरीमुळे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांची डोकेदुखी वाढली आहे. थेट नगरसेवक दिपक देशमुख आणि संजय फड यांनी पुन्हा तिकीट नाही दिलं तरी हरकत नाही. पण पाण्यातील पाप सहन करणार नाही असा पवित्रा घेतं नगरपालिकेविरोधात आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. यातच  सत्ताधारी पार्टीचे नगरसेवक पाणी प्रश्नावरून नगर परिषदेसमोर उपोषण करत आहेत, याला नेमकं म्हणायचे तरी काय? अशी चर्चा आता सगळीकडे सुरू आहे.

खरंतर, नगरपालिकामध्ये एकाच्या हातात सर्व कारभार दिल्यामुळे इतर नगरसेवक नाराज आहेत. मात्र या मतभेदामुळे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमधील गटबाजी दिसून आली. या अगोदर प्रभाग 1 आणि प्रभाग 7 चे काही नागरिक पाणी प्रश्नावरून राष्ट्रवादीच्या नगर सेवकांच्या मनमानी कारभाराला कंटाळून नगरपालिकेसमोर अमरण उपोषणासही बसले होते.

8 दिवसाच्या फरकाने परत शिक्षण सभापती यांना नगर पालिकेत पाणी प्रश्नावरून ठिय्या आंदोल करण्याची वेळ आली होती. बीडमध्ये जर नागरिकांना तसंच सत्ताधारी नगरसेवकांना पाण्याच्या प्रश्नावरून असं आंदोलनं आणि आमरण उपोषण करावं लागत आहे तर सामान्य जनतेचे काय? असा सवाला आता उपस्थित होतं.

सध्या परळी शहरात पाणी प्रश्न ही मोठी समस्या असून या संदर्भात तातडीने उपाय योजना करणं गरजेचं आहे. अशा गंभीर प्रश्नावरदेखील पालिका प्रशासनाकडून सकारात्मक काम केलं जात नाही. मग नगरपालिका प्रशासन झोपेत आहे का? असा सवाल परळीकरांनी उपस्थित केला आहे.

या प्रकरणात बीड नगरसेवकांनी नगर परिषदेच्या मुख्याधिंकाऱ्यांना धारेवर धरलं आहे. यावेळी अरविंद मुंडे यांनी प्रशासनाच्यावतीने सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत असल्याची प्रतिक्रिया दिली. त्यामुळे आता या सगळ्यावर धनंजय मुंडे काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.


VIDEO: प. बंगालमध्ये राजकीय वातावरण तापलं, भाजप नेते-पोलिसांमध्ये घमासान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 14, 2019 04:28 PM IST

ताज्या बातम्या