सुरक्षा दलाची मोठी कारवाई, 3 महिलांसह 4 नक्षलावाद्यांचा केला खात्मा

सुरक्षा दलाची मोठी कारवाई, 3 महिलांसह 4 नक्षलावाद्यांचा केला खात्मा

चकमकीनंतर जवानांनी 4 मृतदेहांना ताब्यात घेतलं आहे. घटनास्थळावरून जवानांनी नक्षलवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे.

  • Share this:

छत्तीसगड, 06 जुलै : छत्तीसगडच्या धमतरी जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. यामध्ये 4 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मेचका पोलीस ठाणे क्षेत्रातील जंगलात ही चकमक झाली आहे. यामध्ये 1 पुरुष आणि 3 महिला नक्षलवाद्यांना ठार करण्यात आला आहे.

चकमकीनंतर जवानांनी 4 मृतदेहांना ताब्यात घेतलं आहे. घटनास्थळावरून जवानांनी नक्षलवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. डीआयजी नक्शल ऑपरेशन सुंदरराज पी यांनी या चकमकीची माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांसोबत अजूनही चकमक सुरू आहे. नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षारक्षकांचं हे मोठं ऑपरेशन मानलं जातं. तर सध्या संपूर्ण परिसरात सर्चिंग ऑपरेशन सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

नक्षली हल्ल्याचा होता अंदाज...

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलाला मोठा नक्षलवादी हल्ला होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर शनिवारी सकाळी एसटीएफ आणि डीएफच्या संयुक्त टीमद्वारे सर्चिंगसाठी निघाले. त्यावेळी घेराबंदी करत नक्षलवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्याला सुरक्षा दलानेही प्रत्युत्तर दिलं. यावेळी 4 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

रानडुकराचा दिव्यांग तरुणावर हल्ला; जीव वाचवतानाची धडपड कॅमेऱ्यात कैद

First published: July 6, 2019, 1:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading