खूशखबर !!! दुसऱ्या तिमाहीत आर्थिक विकास दर 6.3 टक्क्यांवर पोहोचला
खूशखबर !!! दुसऱ्या तिमाहीत आर्थिक विकास दर 6.3 टक्क्यांवर पोहोचला
गेल्या तिमाहीत 5.7 टक्क्यांपर्यंत घसरलेला देशाचा आर्थिक विकासदर दुसऱ्या तिमाहीत मात्र 6.3 टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्यावर्षीची नोटबंदी आणि त्यापाठोपाठ जुलै महिन्यात जीएसटी लागू झाल्याने देशाच्या आर्थिक विकासदरात मोठी घसरण झाली होती. देशाचा आर्थिक विकास दर एका झटक्यात 3 ट्क्क्यांनी घटला होता.
30 नोव्हेंबर, नवी दिल्ली : गेल्या तिमाहीत 5.7 टक्क्यांपर्यंत घसरलेला देशाचा आर्थिक विकासदर दुसऱ्या तिमाहीत मात्र 6.3 टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्यावर्षीची नोटबंदी आणि त्यापाठोपाठ जुलै महिन्यात जीएसटी लागू झाल्याने देशाच्या आर्थिक विकासदरात मोठी घसरण झाली होती. देशाचा आर्थिक विकास दर एका झटक्यात 3 ट्क्क्यांनी घटला होता. यावरूनच पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय अर्थमत्र्यांना टीकेचं लक्ष केलं होतं. पण दुसऱ्या तिमाहीतले आकडे मात्र, केंद्र सरकारसाठी काहिसा दिलासा देणारे आहेत.
देशाची अर्थव्यवस्था आता नोटबंदी आणि जीएसटीच्या धक्क्यातून हळूहळू सावरत असल्याचीच ही चिन्हं दिसताहेत. पुढच्या तिमाहीत परकीय गुंतवणूक वाढल्यानंतर पुढच्या तिमाहीत देशाच्या आर्थिक विकासदरात आणखी वाढ होऊन तो 6.4 टक्क्यांवर पोहोचेल, असं काही अर्थतज्ज्ञांना वाटतंय.
गेल्या दोन वर्षातील देशाचा आर्थिक विकास दरजुलै ते सप्टेंबर 2015: 7.4%ऑक्टोबर ते डिसेंबर 2015: 7.3%जानेवारी ते मार्च 2016: 7.9%एप्रिल ते जून 2016: 7.1%जुलै ते सप्टेंबर 2016: 7.3%ऑक्टोबर ते डिसेंबर 2016: 7%जानेवारी ते मार्च 2017: 6.1%एप्रिल ते जून 2017: 5.7%जुलै ते सप्टेंबर 2017 : 6.3 %
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.