मुख्यमंत्री माजलगावच्या 'ललिता साळवे'ला न्याय देणार का ?

मुख्यमंत्री माजलगावच्या 'ललिता साळवे'ला न्याय देणार का ?

राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनीही ललिता साळवे हिची लिंग बदल शस्त्रक्रियेची मागणी फेटाळून लावलीय. तिला महिला कोट्यातून पोलिसाची नोकरी मिळाली असल्याने ती असं करू शकत नाही, आणि समजा तिने लिंग बदल केलाच तर तिला तिची पोलीस दलातली नोकरी गमवावी लागेल, अशी आडमुठी भूमिका पोलिस महासंचालकांनी घेतलीय.

  • Share this:

22 नोव्हेंबर, मुंबई : राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनीही ललिता साळवे हिची लिंग बदल शस्त्रक्रियेची मागणी फेटाळून लावलीय. तिला महिला कोट्यातून पोलिसाची नोकरी मिळाली असल्याने ती असं करू शकत नाही, आणि समजा तिने लिंग बदल केलाच तर तिला तिची पोलीस दलातली नोकरी गमवावी लागेल, अशी आडमुठी भूमिका पोलिस महासंचालकांनी घेतलीय. त्यामुळे आता मुख्यमंत्री तरी ललिता साळवेला न्याय देणार का हेच पाहायचं आहे कारण, राज्याचे गृहमंत्रीही तेच आहेत.

याबाबतची सविस्तर हकिगत अशी की, मुळची राजगावची 25 वर्षीय ललिता साळवे ही मुलगी पाच वर्षांपूर्वी बीड पोलीस दलात महिला कॉन्स्टेबल म्हणून भरती झालीय. पण तिच्या शरिरात सातत्याने होणाऱ्या हार्मोन्स बदलांमुळे डॉक्टरांनी तिला लिंग बदल शस्त्रक्रियेला सल्ला दिलाय. त्यानुसार तिने रितसर बीडचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्याकडे लिंगबदल शस्त्रक्रियेसाठी एक महिन्याच्या रजेचा अर्ज देखील केला. पण त्यांनी तो अर्ज राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे पाठवला पण तिथे ललिता साळवेची मागणी अजब ठरवून तिला लिंगबदलाची परवानगी नाकारण्यात आलीय. समजा तिला लिंग बदल करायचाच असेल तर तिला तिची नोकरी गमवावी लागेल, आणि तिला पुन्हा पुरूष गटासाठीच्या सर्व चाचण्या उतीर्ण करून मगच पोलीस दलात पुन्हा दाखल होता येईल, अशी आडमुठी भूमिका पोलीस महासंचालकांनी घेतलीय. त्यामुळे ललिता साळवे हिच्यासमोर हायकोर्टात जाण्यासमोर पर्यायच उरलेला नाही. पण या निमित्ताने राज्याच्या पोलीस प्रशासनाची जुनाट विचारसरणी पुन्हा अधोरेखित झालीय.

विशेष म्हणजे या लिंगबदल प्रकरणात ललिताचे फक्त कुटुंबीयच नाहीतर अख्खं तिच्या पाठिशी ठामपणे उभा राहिलंय. पण तिचं स्वतःचंच पोलीस दल मात्र, तिला समजून घ्यायला अजिबात तयार नाहीये. थोडक्यात आपल्या समाजाचीही मानसिकता सुधारताना दिसतेय पण प्रशासकीय यंत्रणेची मानसिकता मात्र अजूनही जुनाट पद्धतीचीच असल्याचं दिसतंय. पण मुळात मुद्दा असा आहे की, एखादी व्यक्ती पोलीस दलात सर्व शारिरिक चाचण्या पास करून दाखल झाली असेल तर परत केवळ लिंग बदल शस्त्रक्रिया केली म्हणून त्या व्यक्तीला परत पुन्हा सर्व भरती होण्याची काहीच आवश्यकता नाही. पण केवळ महिला कोट्याचं कारण पुढे करून पोलीस प्रशासन ललिता साळवेची अडवणूक करतंय. अशीच समाजभावना तयार होतेय. कारण ललिताने स्त्री म्हणून जगायचं की पुरूष म्हणून, हा सर्वस्वी तिचा निर्णय आहे.

 

First published: November 22, 2017, 2:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading