महाराष्ट्रासाठी सगळ्यात मोठी बातमी, अमित शहांकडून 'इट्स फायनल'

महाराष्ट्रासाठी सगळ्यात मोठी बातमी, अमित शहांकडून 'इट्स फायनल'

राज्यात देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यात उच्चस्तरीय बैठक पार पडली.

  • Share this:

प्रशांत लिला रामदास, प्रतिनिधी

नवी दिल्ली, 06 नोव्हेंबर : विधानसभेचा निकाल लागल्यापासून राज्यात सुरू असलेला सत्ता संघर्षाला भाजपकडून पूर्णविऱ्हाम देण्यात आला आहे. 'केंद्रात नरेंद्र तर राज्यात देवेंद्र' यावर अमित शहा यांच्याकडून शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. राज्यात देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यात उच्चस्तरीय बैठक पार पडली. यामध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तर पुढच्या दोन दिवसांत राज्यात सरकार स्थापन होण्याच्या हालचालींना आता भाजपमधून वेग आला आहे.

न्यूज18 लोकमतला विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेविषयी एकमत न झाल्यामुळे अखेर केंद्रातून अमित शहा यांनी शेवटचा निकाल जाहीर केला आहे. दिल्लीमध्ये कॅबिनेट बैठकीदरम्यान, मोदी आणि अमित शहा यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर भाजपने सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे.

मात्र, भाजपने निवडणूक प्रचारादरम्यान स्पष्ट केले होते की, देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री पदाचे चेहरे असतील. पण विधानसभेच्या निकालानंतर शिवसेनेच्या भूमिकेमुळे सर्व समीकरणे बदलली. मुख्यमंत्रीपदाचा दावा शिवसेनेकडून केला जात होता. यामुळे निकालाच्या 14 दिवसानंतरही राज्यात नवीन सरकार स्थापन होऊ शकले नाही. अशा परिस्थितीत आरएसएसलाही मध्यस्थीसाठी पुढे यावे लागले. अशात नितीन गडकरी यांचे नावदेखील मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत समोर आलं. मात्र, मोदी आणि शहा यांच्या भेटीनंतर आता मुख्यमंत्री पदावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

सरकार स्थापन करण्यासाठी हालचालींना वेग

बुधवारी सायंकाळपासूनच नवीन सरकार स्थापन करण्याच्या हालचाली तीव्र झाल्या आहेत. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील गुरुवारी सकाळी राज्यपालांची भेट घेणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे असा विश्वास आहे की या बैठकीत भाजप सरकार बनवण्याचा दावा करेल.

नवा मुख्यमंत्री आमचाच असेल..!

खरंतर, पुढचे मुख्यमंत्री हे आमचेच असतील असा दावा शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून करण्यात येत आहे. काहीही झालं तरी पुढचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल अशी ठाम भूमिका शिवसेनेकडून मांडण्यात आली आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवल्याशिवाय उद्धव ठाकरे स्वस्थ बसणार नाही असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला.  तर यावेळी त्यांनी भाजपवरही जोरदार टीका केली. शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल ही गोड बातमी स्वत: मुनगंटीवार देतील असं राऊत म्हणाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 6, 2019 09:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading