मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

देवेंद्र फडणवीसांना आधी उपमुख्यमंत्री केलं, आता कॅबिनेटवरही राहणारा नाही होल्ड

देवेंद्र फडणवीसांना आधी उपमुख्यमंत्री केलं, आता कॅबिनेटवरही राहणारा नाही होल्ड

 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल काँग्रेस जे बोलते तेच उद्धव ठाकरे बोलले. उद्धव ठाकरेंना माहिती तरी आहे का ?

'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल काँग्रेस जे बोलते तेच उद्धव ठाकरे बोलले. उद्धव ठाकरेंना माहिती तरी आहे का ?

एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये मंत्रिमंडाच्या विस्तारात हायकमान देवेंद्र फडणवीसांना फ्रीहँड देणार नसल्याचीही चर्चा आहे.

    मुंबई, 7 जुलै : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री केलं. फडणवीस 2014 ते 2019 पर्यंत मुख्यमंत्री होते. धक्कादायक बाब म्हणजे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये मंत्रिमंडाच्या विस्तारात हायकमान देवेंद्र फडणवीसांना फ्रीहँड देणार नसल्याचीही चर्चा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हायकमान यांच्यानुसार पक्ष प्रमुखांनी सरकारवर नियंत्रण तर ठेवायलाच हवं, शिवाय पक्षातदेखील हस्तक्षेप ठेवायला हवा. शिवसेनेतून आलेले आणि अपक्ष आमदारांना कोणतं मंत्रिपद दिलं जाईल, यावर हायकमान चर्चा करणार आहे. यात मुंबईच्या आमदारांवर फोकस करण्यात येईल. फडणवीसांशी न जुळणाऱ्या नेत्यांना मुख्य पदं देण्याची तयारी... देवेंद्र फडणवीसांच्या लीडरशीपमध्ये राज्यात पक्ष मजबूत झाला आहे. तर फडणवीसांशी न जुळणाऱ्याचं म्हणणं आहे की, त्यांच्या लीडरशीपमध्ये भाजपच्या प्रामाणिक नेत्यांना बाजूला करण्यात आलं. अशावेळी हायकमान समतोल आणण्याचा प्रयत्न करेल अशी चर्चा आहे. त्यामुळे ज्या नेत्यांना बाजूला करण्यात आलं होतं, त्यांना मुख्य भूमिका मिळू शकते. भाजपच्या एका नेत्याने सांगितलं की, गृह मंत्रालय देवेंद्र फडणवीसांऐवजी सुधीर मुनगंटीवारांना दिलं जाऊ शकतं. याशिवाय काही अन्य नेत्यांचा ज्यांचं फडणवीसांसोबत जमत नाही त्यांचा कॅबिनेटमध्ये प्रवेश होऊ शकतो. मुंबईच्या नेत्यांना मंत्रिमंडळात अधिक महत्त्व दिलं जाईल. येत्या काळात महानगरपालिका निवडणुका आहेत. अशात मुंबईच्या आमदारांना मंत्रिपद दिलं जाऊ शकतं. विशेषत: शिवसेनेला बीएमसीमधून बाहेर काढणं यावर भाजप फोकस करेल. कॅबिनेटमध्ये ज्या भाजप नेत्यांना मुख्य मंत्रिपद मिळतील त्यात, आशिष शेलार यांचं नाव आहे. जे अमित शहा यांच्या जवळचे असल्याचे मानलं जातं. जर त्यांना मंत्रिपद दिलं नाही तर त्यांच्यावर प्रदेश अध्यक्षपद सोपवण्यात येऊ शकतं.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Amit Shah, BJP, Devendra Fadnavis

    पुढील बातम्या