'खडसेंनी मला व्हिलन ठरवलं, ते अर्धसत्य सांगत आहेत', देवेंद्र फडणवीसांचा पहिला पलटवार

'खडसेंनी मला व्हिलन ठरवलं, ते अर्धसत्य सांगत आहेत', देवेंद्र फडणवीसांचा पहिला पलटवार

माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हातात घेण्याचे निश्चित केलं आहे. ते उद्या मुक्ताईनगरमधून मुंबईकडे रवाना होणार आहेत.

  • Share this:

औरंगाबाद, 21 ऑक्टोबर : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप करत पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. खडसे यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार पलटवार केला आहे. 'खडसे जे बोलत आहेत, ते अर्धसत्य आहे. खडसेंनी मला व्हिलन ठरवलं,' असा घणाघात फडणवीस यांनी केला.

'मी खडसेंवर जास्त बोलणार नाही. खडसेंनी राजीनामा द्यायला नको होता. चंद्रकांत पाटलांनी सविस्तर उत्तर दिलं आहे. मी खडसेंवर योग्य वेळी बोलेन,' असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसंच भाजपचा कोणताही आमदार फुटणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते औरंगाबादमधील पत्रकार परिषदेत बोलत होते.

काय होता खडसेंचा आरोप?

देवेंद्र फडणवीसांनी माझे राजकीय आयुष्य उद्धवस्त केल्यामुळेच भाजप पक्ष सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. पक्षावर व कार्यकारणीवर मी नाराज नाही. परंतु देवेंद्र फडणवीसांनी ज्या प्रमाणे माझी राजकीय आयुष्य उद्धवस्त करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मी चार वर्ष मानसीक तणावाखाली घालवली,' अशा शब्दांत एकनाथ खडसे यांनी आपला संताप व्यक्त केला.

खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची जय्यत तयारी

माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हातात घेण्याचे निश्चित केलं आहे. ते उद्या मुक्ताईनगरमधून मुंबईकडे रवाना होणार आहेत. या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. काही कार्यकर्त्यांनी आपल्या हातावर एकनाथ खडसे यांचे टॅटू बनवले आहेत. तसंच असंख्य कार्यकर्ते हे खडसेंचा फोटो आतावर गोंदवून घेत आहेत.

First published: October 21, 2020, 6:52 PM IST
Tags:

ताज्या बातम्या