मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

'फडणवीसांचे मुहूर्त कायम चुकीचेच, त्यांना काय झालंय हेच समजत नाही'

'फडणवीसांचे मुहूर्त कायम चुकीचेच, त्यांना काय झालंय हेच समजत नाही'

'उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी अभिष्टचिंतन करण्याचे सोडून फडणवीसांनी भाजप कार्यकारिणी बैठक घेत त्यांना अपशकून केला'

'उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी अभिष्टचिंतन करण्याचे सोडून फडणवीसांनी भाजप कार्यकारिणी बैठक घेत त्यांना अपशकून केला'

'उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी अभिष्टचिंतन करण्याचे सोडून फडणवीसांनी भाजप कार्यकारिणी बैठक घेत त्यांना अपशकून केला'

कोल्हापूर, 01 ऑगस्ट :  राज्यभरात दूध दरवाढीसाठी भाजपने आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाच्या निमित्ताने महाविकास आघाडी सरकार आणि भाजप पुन्हा आमनेसामने आले आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कायम चुकीचेच मुहूर्त काढत काढत आहेत, असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला.

दूध आंदोलनावर पत्रकारांशी बोलत असताना हसन मुश्रीफ यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली.

'भाजपचे दूध दरासाठीचे आंदोलन योग्यही असेल. दुधाला दर मिळालाच पाहिजे. परंतु, आंदोलनासाठी त्यांनी काढलेला मुहूर्त चुकीचा आहे.  शासकीय सुट्टीच्या दिवशी व बकरी ईद असताना आंदोलन पुकारले आहे, अशा परिस्थिती त्यांच्याकडे कोण लक्ष देणार?' असा सवाल उपस्थितीत करत भाजपला टोला लगावला आहे.

घरासमोर खेळत असलेल्या चिमुरड्यांना पिकअप व्हॅनने चिरडले,7 वर्षांची मुलीचा मृत्यू

'सत्तेवरुन पाय उतार झाल्यापासून देवेंद्र फडणवीस यांना अलीकडे काय झालं समजत नाही. त्यांनी काढलेला मुहुर्त नेहमीच चुकीचा ठरत आहे. चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी अभिष्टचिंतन करण्याचे सोडून फडणवीसांनी भाजप कार्यकारिणी बैठक घेत त्यांना अपशकून केला', अशी टीकाही मुश्रीफ यांनी केली.

दरम्यान, राज्यभरात भाजपचे दूध आंदोलनाला सुरुवात झाली आहे.  महायुतीचे नेते आणि रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्त्वाखाली सकाळी पंढरपूर येथील सांगोला चौक येथे असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी दिनी प्रतिमेस अभिवादन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरीचा राजा पांडुरंग याच्या चरणी दुधाचा अभिषेक घालून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.

VIDEO : पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या युवकाला 3 तरुणांकडून बेदम मारहाण

'महाविकास आघाडी सरकार हे मुक्याचे, बहिऱ्यांचे आणि आंधळ्यांचे असून या सरकारमधील मंत्री झपाटलेल्या सिनेमातील कलाकार असून हे आपल्याच भातावर डाळ ओढण्याचे काम करीत आहेत' अशी खरमरीत टीका   सदाभाऊ खोत यांनी केली.

तसंच, 'या राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाईच्या दुधाला 10  रुपये अनुदान द्यावे आणि दूध भुकटीला प्रति किलो 50 रुपये निर्यात अनुदान देण्याची सुबुद्धी दे बा...विठ्ठला असं म्हणत खोत यांनी पांडुरंगाच्या चरणी साकडं घातलं.

First published: