'मुख्यमंत्र्यांना शेजारी बसलेल्या दोघांची काळजी', उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर फडणवीसांची टीका

'मुख्यमंत्र्यांना शेजारी बसलेल्या दोघांची काळजी', उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर फडणवीसांची टीका

शेतकऱ्यांच्या 25 हजार कर्जमाफीवर काय आजच्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी साधा हजार रुपयांचाही उल्लेख केला नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी, सावरकरकांच्या मुद्दा, मराठा आरक्षण यावर मुख्यमंत्र्यांनी काहीही उत्तर दिलं नाही.

  • Share this:

मुंबई, 19 डिसेंबर : महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी भाजपकडून मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर सभात्याग करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर दिलं. दोन्ही सभागृहांमध्ये विरोधकांनी आपली राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दलची भूमिका मांडली होती. त्यात हे सरकार स्थगिती सरकार आहे अशा टीका देखील करण्यात आली होती. त्यावर उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर दिलं. पण उद्धव ठाकरेंच्या अभिभाषणात शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा एकही उल्लेख नसल्याने भाजपने सभागृहात गोंधळ घालत सभात्याग केला आहे.

शेतकऱ्यांच्या 25 हजार कर्जमाफीवर काय आजच्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी साधा हजार रुपयांचाही उल्लेख केला नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी, सावरकरकांच्या मुद्दा, मराठा आरक्षण यावर मुख्यमंत्र्यांनी काहीही उत्तर दिलं नाही. शेतकऱ्यांना अवकाळी पावसाची मदत देणार म्हणून एक दमडीही दिली नाही. त्यामुळे हे विश्वासघातकी सरकार असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

इतर बातम्या - मुंबईत उद्योगपतीने मित्रांसोबत केली पत्नीची देवाणघेवाण, 3 वेळा केला बलात्कार

शेकऱ्यांच्या सर्व प्रश्नांवर या सरकारने त्यांच्या तोंडाला पानं पुसली. आतापर्यंतच्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांचं असं पहिलं भाषण आहे ज्यामध्ये काहीही उत्तर मिळालं नाही. शेतकऱ्यांचा साधा उल्लेख नाही. त्यामुळे या शेतकऱी विऱोधी सभेचा आम्ही त्याग केला असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.

खरंतर, हे सगळी खुर्ची वाचवण्याची कवायत आहे. शेजारी बसलेल्या दोघांना जपण्यासाठी आणि त्यांच्याविरोधात कोणतंही स्टेटमेंट न करण्याचा आणि त्यांना नाराज न करण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे. तर शेतकऱ्यांसाठी हा काळा दिवस आहे त्यामुळे आम्ही सभेचा त्याग केला असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

इतर बातम्या - दिल्लीत CAA वरून तणाव, महामार्गावर 8 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 19, 2019 12:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading