'ज्यांचे कॅप्टन खेळायला तयार नाहीत ते काय निवडणूक जिंकणार'

'ज्यांचे कॅप्टन खेळायला तयार नाहीत ते काय निवडणूक जिंकणार'

'राहुल गांधींचं भाषण म्हणजे, टीव्ही सीरिअलसारखं असतं. या मालिकेतील कथा आणि पात्र काल्पनिक असतात.' असंही मुख्यमंत्री म्हणाले.

  • Share this:

परभणी, 12 एप्रिल : युतीचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेमध्य़े मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. 'ज्यांचे कॅप्टन खेळायला तयार नाहीत ते काय जिंकणार' असं म्हणत फडणवीसांनी शरद पवारांवर निशाणा साधला. शरद पवारांनी माढातून माघार घेतली त्यावर निशाणा साधत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर टीका केली.

या सभेवेळी देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना लक्ष केलं. 'राहुल गांधींनी जाहीरनाम्यात 72 हजार देऊ असं म्हटलं आहे. पण ते देणार कसे हे नाही सांगितलं' अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. तर यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्या भाषणावरही टीका केली. 'राहुल गांधींचं भाषण म्हणजे, टीव्ही सीरिअलसारखं असतं. या मालिकेतील कथा आणि पात्र काल्पनिक असतात.' असंही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्ममंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे

- मोदींच्या नेतृत्वात सामान्य माणसाच्या जीवनत परिवर्तन करणारं आमचं सरकार आहे.

- स्वच्छ भारत अभियान माध्यमातून घरोघरी शौचालय पोहचली आहेत.

- पाच वर्षात मोदींनी उज्वला योजनेतून गरींबाच्या घरात गॅस पोहचवला.

- 2022 सालपर्यंत एकही बेघर राहणार नाही.

हेही वाचा: SPECIAL REPORT : मुलगा की पक्ष? विखेंनी निवडला हा मार्ग!

- 68 वर्षात जे रस्ते झाले नाही ते गडकरी साहेबांनी केले

- मराठवाड्यातील रस्त्यांचे चित्र येणाऱ्या काळात बदललं दिसेल

- मराठवाड्यात उद्योगांना सवलतीच्या दराने वीज दिली

- निवडणूक राष्ट्रीय अस्मितेची, देशाला मजबूत सरकार द्यायचे आहे

- मुंबईवर पाकिस्तान अतिरेक्यांनी हल्ला केला. आता उरी सारखा हल्ला झाला, सर्जिकल स्त्राइक केलं.

'आधी मी पाणी पितो मग काँग्रेसला पाजतो'

निवडणुकीतलं भाषण म्हणजे जोष आणि आवेश असतो. जाहीर सभांमध्ये बोलताना जास्त आक्रमक असावं लागतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जाहीर सभांमध्ये आक्रमक भाषणं करत असतात. नांदेडमध्ये गुरुवारी झालेल्या सभेत भाषण करताना मुख्यमंत्र्यांना तहान लागली. तेव्हा थोडं थांबत मुख्यमंत्री म्हणाले, आधी मी पाणी पितो आणि मग काँग्रेसला पाणी पाजतो. काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांच्या विरोधात सभा घेत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला होता.


VIDEO : मोदींच्या सभेपूर्वी भाषण रोखल्यानं दिलीप गांधी भडकले, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 12, 2019 03:39 PM IST

ताज्या बातम्या