निलंग्यातील मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर अपघाताला पायलटच जबाबदार

क्षमतेपेक्षा जास्त वजन असतानाही पायलटनं 'टेक ऑफ'चा प्रयत्न केल्यानंच हा अपघात घडल्याचं चौकशी अहवालात म्हटलं आहे.

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Jun 16, 2017 11:32 AM IST

निलंग्यातील मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर अपघाताला पायलटच जबाबदार

16 जून : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टर पायलटच्याच चुकीमुळे कोसळलं होतं, अशी माहिती चौकशीतून समोर आली आहे. क्षमतेपेक्षा जास्त वजन असतानाही पायलटनं 'टेक ऑफ'चा प्रयत्न केल्यानंच हा अपघात घडल्याचं चौकशी अहवालात म्हटलं आहे.

लातूर जिल्ह्यातील निलंग्यात २५ मे रोजी मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर कोसळलं होतं त्यातून ते थोडक्यात बचावले होते.

ज्या दिवशी ही घटना घडली, तेव्हा लातूरमधील पारा चाळिशीपार होता. अशावेळी, हेलिकॉप्टर उड्डाणात अडथळा येऊ शकतो. त्यामुळे हेलिकॉप्टरच्या क्षमतेपेक्षा कमी वजन घेऊनच उड्डाण करणं अपेक्षित असतं. परंतू, पायलटनं वजनाचा अंदाजच घेतला नाही, तसंच आणखी काही मानकांकडेही दुर्लक्ष केल्यानं थोड्याच उंचीवरून हेलिकॉप्टर खाली आलं, असं एएआयबीच्या अहवालात म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 16, 2017 11:32 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...