'फेसबुक' लाँच करणार मॅसेंजर अ‍ॅपचं डेस्कटॉप व्हर्जन; अशी आहेत फिचर्स

चालू वर्षातच लाँच होणार 'फेसबुक मॅसेंजर'चं डेस्कटॉप व्हर्जन

  • Share this:

फेसबुक मॅसेंजरचं डेस्कटॉप वर्जन लाँच करण्यासह त्यात अनेक नवी फिचर्स अॅड होणार असल्याची घोषणा फेसबुकने केली. नुकत्यात पार पडलेल्या अॅन्युअल डेव्हलपर कॉन्फरन्स (वार्षिक विकसक परिषद)मध्ये फेसबुकच्या अधिकाऱ्यांनी ही घोषणा केली.

फेसबुकचं मॅसेंजर अॅप Windows आणि macOS या दोन्ही प्रणालीसाठी तयार करण्यात येणार आहे. यात ग्रुप मॅसेजिंग, व्हिडिओ चॅटिंग, GIF इमेजेस पाठविण्याची सुविधा यात युजर्सना मिळेल. सद्या हे अॅप टेस्टिंग मोड मध्ये असून, चालू वर्षातच ते लाँच करण्यात येणार असल्याचं फेसबुकने म्हटलं आहे.

तसंच group viewing नावाचं आणखी एक फिचर यात अॅड होणार आहे. ज्याचा उपयोग मित्रांसोबत व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही करू शकाल. एवढंच नव्हे तर तो व्हिडिओ सुरू असताना तुम्ही संभाषण देखील करू शकाल. कोणता व्हिडिओ प्लॅटफॉर्म या फिचरला सपोर्ट करणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

चॅटिंग करताना तुमच्यात आणखी उत्साह निर्माण करण्यासाठी फेसबुक मॅसेंजरमध्ये एक डेडीकेटेड स्पेस देण्यावर फेसबुक विचार करत आहे. ज्यात तुम्हाला आणि तुमच्या मित्रांना आवडीनुसार कंटेट मिळवता येईल. याशिवाय तुम्ही काही लोकांनाच दिसू शकेल असा मॅसेज किंवा स्टोरी तयार करू शकाल.

याशिवाय फेसबुक बिजनेससाठी मॅसेंजरचा उपयोग आणखी रंजक बनवण्यार फेसबुक भर देत आहे. फेसबुक मॅसेंजरमध्ये लवकरच नव्या स्वरूपात जाहिराती झळकतील ज्याचा उपयोग व्यावसायिकांना उत्तम प्रकारे करून घेता येईल. तसंच अपॉइंटमेंट हे नवं फिचरसुद्धा यात अॅड होणार आहे. ज्यात कोणत्याही हॉटेल मालकाशी बोलून तुम्ही बुकिंग करू शकाल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 1, 2019 08:55 PM IST

ताज्या बातम्या