येणारा काळ कठीण, गर्दी कमी न झाल्यास कठोर निर्णय घ्यावा लागेल- अजित पवार

येणारा काळ कठीण, गर्दी कमी न झाल्यास कठोर निर्णय घ्यावा लागेल- अजित पवार

जिथं आवश्यक आहे तिथं सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात येईल. मुंबईच नव्हे तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये देखील असा निर्णय घेतला जाऊ शकतो, असं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.

  • Share this:

पुणे,20 मार्च: कोरोना व्हायरसच्या आपण सध्या दुसऱ्या टप्प्यात आहोत. मात्र, येणारा काळ कठीण आहे. गर्दी कमी झाली नाही तर बस आणि रेल्वे सेवाही बंद करण्याचा कठोर निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. कोरोना व्हायरसच्या या संकटाविरोधात राज्य सरकार सगळ्या उपाययोजना करत आहेत. यामध्ये नागरिकांनी सहकार्य करावे, असं आवाहनही अजित पवार यांनी यावेळी केलं.

हेही वाचा...हे फक्त पुण्यातच घडू शकतं! आठवलेंच्या Corona Go नंतर पुण्याचा हा VIDEO व्हायरल!

कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्याच्या संदर्भात शासन काय उपाययोजना करत आहे आणि नागरिकांनीही त्याला सहकार्य करणं अपेक्षित आहे, याबाबत अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

अजित पवार यांनी सांगितलं की, प्रत्येक राज्यात मेडिकल टीम पाठवल्या आहेत. कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी जे कर्मचारी काम करतायत त्यांना विश्रांती देणंही गरजेचं. त्यांना पर्यायी कर्मचारी दिले जातील. रुग्णालयात काम करणारे डॉक्टर्स, कर्मचारी, पोलीस प्रशासनातील कर्मचाऱ्यांनाही एक दिवस सुट्टी कशी करता येईल यासाठीही चर्चा सुरू आहे.

हेही वाचा..8 वर्षीय चिमुकलीचा मृतदेह सापडला, 12 मार्चपासून होती बेपत्ता, समोर आलं भयानक सत्य

विवाह, अंत्यविधीप्रसंगी होणारी गर्दी टाळली पाहिजे. सरकारी कार्यालये 25 टक्के कर्मचाऱ्यांसह कशी चालवता येतील यासाठी प्रयत्न चालू आहेत. मात्र ज्यांचं हातावर पोट आहे, त्यांच्या बाबतीत मालकांमी माणुसकीने वागून त्यांनी किमान वेतन द्यावे अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.

जिथं आवश्यक आहे तिथं सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात येईल. मुंबईच नव्हे तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये देखील असा निर्णय घेतला जाऊ शकतो, असं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.

अजित पवार म्हणले, 'सगळी माहिती खोटी आहे. पाहिजे तर पार्थचा पासपोर्ट दाखवतो.'

गेल्या काही दिवसांपासून WhatsAppवर फिरणाऱ्या पार्थ पवारांविषयीच्या माहितीवरही त्यांनी भूमिका स्पष्ट केली. अजित पवार म्हणाले, सगळी माहिती खोटी आहे. पार्थ पवारचा बाप सांगतोय की तो सिंगापूरला चार महिने झाले गेलाच नाहीय. पाहिजे तर त्याचा पासपोर्ट दाखवतो असंही ते म्हणाले. पार्थ हा सिंगापूरमध्ये अडकून पडला आहे आणि त्याच्या सुटकेसाठी विशेष विमान पाठविण्यात आलं होतं असा मेसेज WhatsAppवर व्हायरल झाला होता. त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं.

हेही वाचा..महाराष्ट्राची #Italy होऊ द्यायची नसेल तर 'सरकारी कर्फ्यू' जाहीर करा, मनसे आमदाराची मागणी

आणखी काय म्हणाले पवार?

निधीची अडचण कुणालाच येऊ देणार नाही. पेशंटने पण डॉक्टरांचं ऐकावं आणि लवकर बरं व्हावं. आरोग्यमंत्र्यांच काम कौतुकास्पद, चांगल्याला चांगलं म्हणावं. मुख्यमंत्री आणि आमचे आरोग्यमंत्री सतत माध्यमांशी बोलताहेत.

आजच्या घडीला ५२ रूग्ण आहेत. पंतप्रधान, देशाचे आरोग्यमंत्री सगळेच सूचना देताहेत.गर्दी टाळायच्या सूचना आहेत. सर्वांनी स्वत:पासून सुरूवात करा. ज्या सूचना करायच्या आहेत. त्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवल्या जातील.

नवीन सुधारित निर्णय घेतलाय, यापूर्वीचे आदेश 31 मार्च पर्यंत होते ते आता पुढचे आदेश निघेपर्यंत हे आदेश लागू राहतील. लग्न समारंभ, दहावे, तेराव्याला गर्दी टाळा, लग्न करण फारच गरजेच असेल तर कमी गर्दीत लग्न लावा.

First published: March 20, 2020, 6:24 PM IST

ताज्या बातम्या