अमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू!

अमरावती शहरात डेंग्यूमुळे मृत पावलेल्यांची संख्या 11 वर जाऊन पोहोचली आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 16, 2018 11:28 PM IST

अमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू!

अमरावती, 16 ऑक्टोबर : अमरावती शहरात डेंग्यूची साथ पसरली असून, गेल्या 24 तासात तिघांचा मृत्यू झालाय. मृत पावलेल्या तिन्ही महिला असून, डेंग्यूमुळे मृत पावलेल्यांची संख्या आता 11 वर जाऊन पोहोचली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, प्रसूतीनंतर डेंग्यूची लागण झाल्यामुळे एका महिलेचा लगेचच मृत्यू झाला. शहरात पसरलेल्या अस्वच्छतेमुळे रोगराई पसरत असल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केलाय.

अमरावती शहरात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूचे रुग्ण आढळताहेत. सोमवारी अवन्तीका अमोल इंगळे नामक महिलेने आपल्या नवजात मुलीला जन्म दिला. मात्र प्रसूतीनंतर तीला डेंग्यूची लागण झाली. डॉक्टरांना तात्काळ तिला अतिदक्षता विभागात हलवलं, मात्र लगेच तिचा उपचारादरम्यान मृत्यू झला. आपल्या नवजात मुलीचा चेहरा सुद्धा तिला पाहता आला नाही. त्यानंतर मंगळवारी सकाळी अश्विनी इंगळे नामक महिलेचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला. अश्विनीलासुद्धा दोन महिन्याची एक चिमुकली आहे. त्याच पाठोपाठ कल्याण नगर परिसरातील युवती प्राजक्ता गाथे हिचाही मृत्यू झाला. यानंतर आमदार रवी राणा यांनी मृत पावलेल्या तिघींच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं.

अमरावती शहरात फक्त स्वच्छतेचा बोजवारा वाजला आहे. स्वच्छता नाही, धुरळणी अजिबात केली जात नाही, तर शहरातल्या सर्वच नाल्या तुंबलेल्या आहेत. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी आमदार रवी राणा यांनी न्यूज18 लोकमतशी बोलताना केली.

तर मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबीयांनी महापालिकेचे अधिकारी दोषी असल्याचे सांगत त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी केलीय. यासंदर्भात मृतकांचे नातेवाईक रावसाहेब इंगळे आणि मनस्वी पोकसे यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय.

तुमच्या मोबाईलमध्ये गुगलचे अॅप खरे आहे ना?,कारण...

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 16, 2018 11:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...