नोटबंदी चूक नाही हा मोठा घोटाळा,राहुल गांधींचा घणाघात

नोटबंदी चूक नाही हा मोठा घोटाळा,राहुल गांधींचा घणाघात

मुळात हा मोठा घोटाळा आहे, आता पंतप्रधान मोदींनी याबद्दल स्पष्टीकरण द्यावे अशी मागणीही त्यांनी केली.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 आॅगस्ट : नोटबंदी हे सरकारचं सर्वात मोठं अपयश आहे. मोदी सरकारने मोठ्या उद्योजकांना काळा पैसा पांढरा करण्यासाठी नोटबंदी केली होती अशी घणाघाती टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. तसंच नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली. राफेल डील घोटाळ्यात सरकारने आपल्या मित्रांनाच मदत केली त्यावर आता मोदी काही बोलत नाही हा घोटाळाच आहे अशी परखड टीकाही राहुल गांधींनी केली.

नोटबंदीच्या काळात किती पैसा रिझर्व्ह बँकेत दाखल झाला याची माहिती जाहीर केली. त्यानंतर आज राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर एकच हल्लाबोल केला. नोटबंदीही निव्वळ फसवली योजना होती. नोटबंदी करून सर्वसामन्यांची फसवणूक केलीये. मुळात मोदींनी नोटबंदी करून त्यांच्या मित्रांना काळापैसा पांढरा करण्यासाठी मदत केलीये असा आरोप राहुल गांधींनी केला.

तसंच नोटबंदीतून कुणाचंही भलं झालं नाही लोकांना रात्रंदिवस रांगेत उभं करून सरकारला काय मिळालं ?, छोटे व्यापारी यात भरडले गेले. पण मोठ्या उद्योजकांना याचा फायदा झाला. 15-20 उद्योजकांना फायदा करण्यासाठीच मोदींनी नोटबंदी लागू केली होती असा आरोपही राहुल गांधींनी केला.

नोटबंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान झालंय. मुळात हा मोठा घोटाळा आहे, आता पंतप्रधान मोदींनी याबद्दल स्पष्टीकरण द्यावे अशी मागणीही त्यांनी केली.

तसंच राफेल डील हा घोटाळाच आहे. सरकारने आपली खोटी बाजू मांडत आहे. अरुण जेटली हे मोठे मोठे ब्लाॅग लिहित आहे पण राफेल खरेदीत नेमकी कशी झाली याचा पुरावच राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत सादर केला आणि आता उत्तर द्या असे जाहीर आव्हानच राहुल गांधींनी अरुण जेटली आणि नरेंद्र मोदींना दिलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 30, 2018 06:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading