नोटबंदीनंतर बँकांचं तब्बल ३ हजार ८०० कोटींचं नुकसान

बँकांच्या पेमेंट यंत्रणेत करण्यात आलेल्या बदलांमुळे हे नुकसान झाल्याचं बँकेनं एका अहवालात म्हटलंय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Sep 28, 2017 11:29 PM IST

नोटबंदीनंतर बँकांचं तब्बल ३ हजार ८०० कोटींचं नुकसान

28 सप्टेंबर : नोटबंदीनंतर बँकांचं तब्बल ३ हजार ८०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचं स्टेट बँक ऑफ इंडियाने स्पष्ट केलंय. बँकांच्या पेमेंट यंत्रणेत करण्यात आलेल्या बदलांमुळे हे नुकसान झाल्याचं बँकेनं एका अहवालात म्हटलंय.

बँकांकडून विकसित करण्यात आलेल्या पॉईंट ऑफ सेलला टेलिकॉम क्षेत्रातील पायाभूत सुविधांकडून पूर्ण सहाय्य मिळायला हवे, असे एसबीआय समूहाच्या मुख्य आर्थिक सल्लागार सौम्या कांती घोष यांनी म्हटलंय. पीओएस मशीनचा वापर डेबिट आणि क्रेडिट कार्ड स्वाईप करण्यासाठी केला जातो.

याशिवाय इतर मुलभूत सोयी सुविधांच्या कमतरतांचा फटकाही बँकांना बसलाय.  टेलिकॉम क्षेत्रातील अपुऱ्या पायाभूत सुविधांचा फटका बँकांना बसला. यामुळे बँकांना मोठं नुकसान सहन करावं लागलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 28, 2017 11:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...