S M L

एका माणसाच्या हट्टापायी नुकसान झाले,राज ठाकरेंची मोदींवर टीका

Updated On: Aug 30, 2018 10:38 PM IST

एका माणसाच्या हट्टापायी नुकसान झाले,राज ठाकरेंची मोदींवर टीका

औरंगाबाद, 30 आॅगस्ट : मी नोटबंदी नंतर चुकीचा निर्णय म्हणून पहिल्यांदा बोललो आता ते सगळे सत्य समोर आलंय. केवळ एका माणसाच्या हट्ट पायी सगळी नुकसान झाले अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे. आज औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर एकच हल्लाबोल केला. मोदींनी नोटबंदी लागू गेली आणि आता त्यांचं सत्य बाहेर आलंय. रिझर्व्ह बँकेनंच पैसे किती परत आले याबद्दल उघड केलंय. हे मीही याआधी बोललो होतो फक्त एका माणसाच्या हट्टामुळे सर्वांचं नुकसान झालं अशी टीका राज ठाकरेंनी केली.

मराठा आंदोलनादरम्यान वाळूज एमआयडीसीमध्ये परप्रांतीयांनी तोडफोड केली होती आणि हे पोलिसांनीही स्पष्ट केलं. त्यामुळे या तोडफोडीचा मराठा आंदोलकांशी काहीही संबंध नव्हता असंही राज ठाकरेंनी यावेळी सांगितलं.

माओवादी संबंधीत पाच जणांना अटकेबद्दल राज ठाकरेंनी भाष्य केलं. लोकशाही टिकवण्यासाठी वेगवेळ्या विचारांची आवश्यकता असावीच लागते अमर्त्य सेन म्हणतात ते खरे आहे भारताची लोकशाही अडचणीत आहेच आपल्याला आता विचार करावाच लागेल असंही राज ठाकरे म्हणाले.

Loading...
Loading...

-----------------------------------------------------------------

स्लॅब कोसळणारा तो थरारक VIRAL VIDEO कुठला ?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 30, 2018 10:38 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close