'त्या' दिवशी एका रात्रीत 4000 किलो सोन्याची विक्री !

या सोन्याची किंमत 1250 कोटी रुपये इतकी आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Nov 8, 2017 05:38 PM IST

'त्या' दिवशी एका रात्रीत 4000 किलो सोन्याची विक्री !

08 नोव्हेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वर्षाआधी 8 नोव्हेंबर 2016ला देशात नोटबंदीची घोषणा केली. या निर्णयात 500-1000च्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे सगळ्यांचीच झोप उडाली होती. या घोषणेनंतर 50 दिवसांसाठी सगळ्यांनाच मोठा त्रास सहन करावा लागला होता. पण ही घोषणा झाल्याबरोबरच देशभरात सराफ बाजारात काळा पैसा पांढरा करणाऱ्यांची संख्या रातोरात वाढली. हाच काळा पैसा पांढरा करण्यासाठी 4000 किलो पेक्षा जास्त सोन्याची खरेदी केली गेली. या सोन्याची किंमत 1250 कोटी रुपये इतकी आहे.

काही तासांमध्ये कोट्यावधी सोन्याची विक्री

- डायरेक्टरेट जनरल ऑफ सेंट्रल एक्साइज इंटेलिजेंस (डीजीसीईआई)च्या माहितीनूसार 8 नोव्हेंबरला रात्री देशभरात 2000 किलो सोन्याची विक्री झाली.

- पहिल्यांदाच एका रात्रीत सोन्याची इतकी मोठी विक्री झाली होती. अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार काळ्या पैश्याला जुन्या नोटा म्हणून सोनं खरेदी केली गेली.

नोटीबंदीच्या दिवशी रात्रभर सराफांची दुकानं चालू होती

Loading...

- सूत्रांच्या माहितीनुसार दिल्लीत एका प्रसिद्ध सराफाने 8 नोव्हेंबरला 700 लोकांना 45 किलो सोनं विकलं होतं.

त्याच्याच एक दिवस आधी त्याने फक्त 820 ग्राम सोन्याची विक्री केली होती.

- चेन्नईच्या एका सराफाने 8 नोव्हेंबरला 200 किलो सोन्याची विक्री केली. एक दिवसाआधी त्याने केवळ 40 किलो वजनाची विक्री केली होती.

- जयपूरच्या सराफाने 7 नोव्हेंबरला 100 ग्राम सोन्याची विक्री केली आणि नोटबंदीच्या घोषणेनंतर त्याने 30 किलो सोन्याची विक्री केली.

या सगळ्यांविरोधात चौकशी सुरू आहे.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय सचिव सुरेंद्र मेहता म्हणाले की, '8 नोव्हेंबरच्या रात्री सगळ्यात जास्त सोन्याची खरेदी दिल्ली, उत्तर प्रदेश, आणि पंजाबमध्ये झाली होती. 8 नोव्हेंबरला 6 लाख सराफांच्या दुकानांमधून 1000 लोकांनी जून्या चलनात सोनं खरेदी केलं होतं.'

पैशांच्या एवढ्या उलाढालीनंतर सरकारने कारवाई करण्यास सुरुवात केली. पैश्यांची ही फेराफेरी मीडियाने बातम्यांद्वारे जगासमोर आणल्यानंतर सरकारला जाग आली आणि कारवाईला सुरुवात झाली. देशभरातल्या प्रसिद्ध सराफांच्या दुकानावर टॅक्स विभागचे छापे घातले आणि नंतर एक्साइज अॅथॉरिटीजने कायदेशीर सोनं विक्रीचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज शोधायला सुरुवात केली.

देशभरातील 400 सराफ व्यवसायिकांनी 20 कोटी रुपयांचा कर चुकवला असल्याची कबुली दिली आहे. डीजीसीईआईने मनी लॉर्डिंगनंतर सर्वेक्षण सुरू केलं होतं. त्यानंतर एजन्सीच्या वतीने कर चुकवण्यासाठी आणि मनी लॉर्डिंगच्या प्रकरणात 300 नोटीसा पाठवण्यात आल्या होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 8, 2017 05:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...