नवी दिल्ली 3 ऑगस्ट: दिल्लीत फेब्रुवारी महिन्यात झालेल्या हिंसाचारावर पोलिसांनी खळबळजनक खुलासा केला आहे. दंगे भडकविण्यासाठी आरोपींना विदेशातून पैसे आले होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपींना विविध देशांमधून 1 कोटी 62 लाख 46 हजार 53 रुपये आले होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. केंद्र सरकारने केलेल्या CCA कायद्याविरोधात दिल्लीत शाहीनबाग आणि अनेक ठिकाणी प्रदर्शन करण्यात आले होते. त्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दिल्ली दौऱ्यावर असतांनाच हिंसाचार उसळला होता.
हे पैसे दिल्लीतल्या 20 प्रदर्शनांसाठी आणि हिंसाचार भडकविण्यासाठी खर्च करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. याच पैशांमधून हिंसाचारासाठी शस्रही खरेदी करण्यात आली होती. त्याच बरोबर प्रक्षोभक साहित्यही तयार करण्यात आलं होतं. ज्याच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले होते त्या आरोपींची नावंही पोलिसांनी जाहीर केली आहेत.
त्यात ताहिर हुसैन, मिरान हैदर, इशरत जहां, शिफा उर रहमान आणि खालिद सैफी यांचा समावेश आहे. सगळ्यात जास्त पैसे हे ताहिर हुसैन यांच्या बँक खात्यात जमा झाले होते.
‘हर्ड इम्युनिटीने व्हायरस संपणार नाही’, कोरोनावरच्या अभ्यासाचे निष्कर्ष
ओमान, कतार, यूएई,, दुबई आणि सऊदी अरेबिया या देशांमधून हा पैसा आला होता. दोन ते तीन दिवस या हिंसाचारात दिल्लीतला एक भाग धुमसत होता. यात काही स्थानिक राजकीय नेत्यांचाही सहभाग असल्याचं पोलिसांचं म्हणणं होतं.
यावरून प्रचंड राजकारणही झालं. केंद्र सरकारने केलेल्या सीसीए कायद्या विरोधात या आंदोलनाने जोर पकडला होता. त्यानंतर त्याचं लोण वाढतच गेलं आणि शेवटी भडका उडाला.
अमित शहा बरे होईपर्यंत ठेवणार रोजा; मुस्लीम नेत्याची अल्लाहकडे प्रार्थना
अध्यक्ष ट्रम्प दिल्लीत असतांनाच हा हिसंचार भडकल्याने त्याविषयी जगभर चर्चा व्हावी आणि भारताची बदनामी व्हावी असा हेतू होता असाही आरोप करण्यात आला होता.
केंद्र सरकारने या हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी विशेष समितीही नेमली होती.