Home /News /news /

Delhi Violence: अफवा पसरवणाऱ्या दोघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, कसून चौकशी सुरू

Delhi Violence: अफवा पसरवणाऱ्या दोघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, कसून चौकशी सुरू

दिल्ली पोलिसांचे पीआरओ एमएस रंधावा यांनी एएनआयला सांगितले की, अफवा पसरवण्यासाठी काही लोकांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत.

    नवी दिल्ली, 02 मार्च : राजधानी दिल्लीमध्ये गेल्या 2 आठवड्यांपासून उफाळलेला हिंसाचार आता कुठे शांत झाला आहे. यामध्ये अफवा पसरवणाऱ्या 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ताब्यात घेतलेले दोघेजण हे दिल्ली हिंसाचार भडकवण्यासाठी अफवा पसरवत होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं असून कसून चौकशी सुरू आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, दिल्लीमध्ये कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही. सगळ्या अफवा पसरवल्या जात आहेत ज्याने सामान्य लोकांची चिंता आणखी वाढेल. दिल्ली पोलिसांचे पीआरओ एमएस रंधावा यांनी एएनआयला सांगितले की, अफवा पसरवण्यासाठी काही लोकांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. अफवा पसरविणाऱ्या आणि द्वेषयुक्त भाषण करणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल, असं रंधावा म्हणाले आहे. रविवारी रात्री दिल्लीच्या काही भागात तणाव निर्माण झाल्याची अफवा पसरली होती. यामुळे सर्वसामान्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. यानंतर दिल्ली पोलिसांनी संयम बाळगण्याचं व अफवांकडे लक्ष न देण्याचं आवाहन केलं आहे. त्याच वेळी, दिल्ली मेट्रोनं सुरक्षेच्या कारणास्तव टिळक नगरसह 7 मेट्रो स्थानकांचं प्रवेश व एक्झीट गेट बंद केलं होतं. यासंदर्भात माहिती मिळाली आहे की, दिल्ली पोलिसांच्या आदेशानुसार दिल्ली मेट्रोनं हा निर्णय घेतला. मात्र, सुमारे एक तासानंतर या सातही मेट्रो स्थानकांचे गेट उघडले. हे वाचा - चंद्रकांत पाटील म्हणजे भाजपचे ‘दादामियां’, शिवसेनेची सडकून टीका रोहिणी परिसरात पसरली अफवा राजधानीच्या रोहिणी भागात सायंकाळी उशिरा गडबड झाल्याची बातमी पसरली. पण नंतर पोलिसांनी या सर्व अहवालांना अफवा असल्याचं सांगितलं. यादरम्यान, शांतता राखण्याचं आवाहन लोकांना केलं गेलं. असे अनेक कॉल केले जात आहेत, जे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करीत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. सोशल मीडियावर पोलिसांची नजर राष्ट्रीय राजधानीतील हिंसाचाराच्या घटना लक्षात घेता दिल्ली पोलीस सतत सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहेत. कोणीही चुकीचा प्रकार केला तर दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल अशा सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत. अफवा पसरेल, आक्रमक किंवा आक्षेपार्ह अशा कोणत्याही व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करू नका असे आदेश देण्यात आले आहेत. असा काही प्रकार झालाच तर सायबर हेल्पलाईन 155260 किंवा सायबर क्राइम डॉट gov.in (सायबर क्राइम.gov.in) वर तक्रार करू शकतात. हे वाचा - दिल्ली हिंसाचारानंतर आता मुंबईतही कलम 144 लागू
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    पुढील बातम्या