दिल्लीनंतर CAA विरोधात आणखी एक राज्य पेटलं; एकाचा मृत्यू, 6 शहरांमध्ये कर्फ्यू

दिल्लीनंतर CAA विरोधात आणखी एक राज्य पेटलं; एकाचा मृत्यू, 6 शहरांमध्ये कर्फ्यू

सीएए आणि आयएलपीविरोधात झालेल्या बैठकीत खासी विद्यार्थी संघटनेचे सदस्य आणि बिगर आदिवासी यांच्यात संघर्ष झाला.

  • Share this:

शिलाँग, 29 फेब्रुवारी : गेल्या आठवड्याभरापासून राजधानी दिल्लीत सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात हिंसाचार उफाळला आहे. या हिंसाचाराचे पडसाद संपूर्ण देशात उमटले. तब्बल 42 जणांनी यामध्ये आपले प्राण गमावले तर 200हून अधिक लोक जखमी अवस्थेत आहेत. अशात आता या हिंसेची झळ इतर राज्यांमध्येही पाहायला मिळते. मेघालय (Meghalaya) पूर्व खासी हिल्स जिल्ह्यात सुधारित नागरिकत्व कायदा (CAA) आणि इनर लाइन परमिट (ILP) वर झालेल्या बैठकीत केएसयू सदस्य आणि बिगर आदिवासी यांच्यात झालेल्या चकमकीत एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर शिलाँगमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. तर सहा जिल्ह्यांत इंटरनेट सेवांवर बंदी आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्फ्यू संपल्यानंतरही शहरातील बहुतेक दुकाने व व्यवसायिक संस्था बंद आहेत.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीएए आणि आयएलपीविरोधात झालेल्या बैठकीत खासी विद्यार्थी संघटनेचे सदस्य आणि बिगर आदिवासी यांच्यात संघर्ष झाला. भारत-बांगलादेश सीमेजवळील जिल्ह्यातील इचामती भागात शुक्रवारी ही बैठक झाली. चकमकीनंतर शिलाँग आणि आसपासच्या भागात शुक्रवारी रात्रीपासून 48 तासांपूर्वी कर्फ्यू लागू करण्यात आली होती. पूर्व जयंतिया हिल्स, पश्चिम जयंतिया हिल्स, पूर्व खासी हिल्स, री भोई आणि दक्षिण पश्चिम खासी हिल्स इथे मोबाइल इंटरनेट सेवा निलंबित करण्यात आल्या आहेत.

इतर बातम्या - मुंबई पोलीस आयुक्तपदी परमबीर सिंह यांची नियुक्ती

कायदा व सुव्यवस्था राखण्याची मोठी गरज

अधिकाऱ्यांनी सांगितले की, दिवसाला फक्त 5 मेसेज पाठवण्याची मर्यादा ठेवण्यात आली आहे. मेघालयचे राज्यपाल तथागत रॉय यांनी लोकांना शांत राहून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. ते एका निवेदनात म्हणाले की, "मी मेघालयातील सर्व नागरिक, आदिवासी किंवा बिगर आदिवासींना शांत राहण्याचे आवाहन करतो. अफवा पसरवू नका आणि त्याकडे दुर्लक्ष करा. मुख्यमंत्री माझ्याशी बोलले आहेत. त्यांनी मला आवश्यक पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे. आता सर्वात मोठी गरज कायदा व सुव्यवस्था राखण्याची आहे. '

इतर बातम्या - पाकचा वेडेपणा तर बघा, आता संसदेत सुरू करणार ब्युटी पार्लर

मेघालयचे गृहमंत्री एल रिमबुई यांनी इचामती येथील घटनेचा निषेध केला. ते म्हणाले की, सत्य शोधण्यासाठी न्यायाधीश चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून कर्फ्यू लावण्यात आला होता आणि मोबाइल इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या.

First published: February 29, 2020, 1:07 PM IST
Tags:

ताज्या बातम्या