नवी दिल्ली, 03 मार्च : दिल्लीतील हिंसाचाराबाबत संसदेत आजही संघर्ष सुरू आहे. खासदारांमध्ये काल झालेल्या गदारोळानंतर आज लोकसभेची कारवाई सुरू होताच पुन्हा गोंधळ सुरू झाला. विरोधी पक्षातील खासदार दिल्ली हिंसाचारावर त्वरित चर्चेची मागणी करीत होते, तर सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराच्या चर्चेनंतर भाष्य केलं. काल झालेल्या गदारोळ आणि गोंधळाबद्दल सभापतींनी विरोधी खासदारांना थेट इशारा दिला की, खासदार दुसर्या जागेवर गेले तर ते संपूर्ण अधिवेशनासाठी त्यांना निलंबित करण्यात येईल.
...तर संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करेन
लोकसभेचे सभापती म्हणाले की, विरोधी पक्षातील खासदारांनी दिल्ली हिंसाचाराबाबत त्वरित चर्चा करावी, या मागणीवर सहमती दर्शविली गेली की गंभीर प्रकरण आल्यास प्रश्नोत्तरानंतरच त्यावर चर्चा होईल. काल झालेल्या धक्का-बुक्कीवर सर्वपक्षीय बैठकीत दोन गोष्टींवरही चर्चा झाली आहे. सभागृहात सत्ता किंवा विरोधी पक्षातील कोणतेही सदस्य एकमेकांच्या आसनावर जाणार नाहीत. असं केल्यास त्यांना मी संपूर्ण सत्रासाठी निलंबित करेन. सभागृह चालू राहिल. '
Budget Session: Lok Sabha adjourned till 12 pm following uproar over #DelhiViolence https://t.co/w3gFzPsneD pic.twitter.com/NXBIrj7SrO
— ANI (@ANI) March 3, 2020
अधीर म्हणाले - दिल्लीत मृतदेह सापडण्याची संख्या वाढत आहे
सभागृहातील सगळ्या गोंधळ्यानंतर काँग्रेसचे खासदार दलाचे नेते अधीर रंजन म्हणाले की, 'आम्ही सामान्य लोकांचे प्रतिनिधित्व करतो. दिल्लीत मृतदेह वाढत आहे. आम्हाला हा विषय उपस्थित करण्याचा अधिकार द्या. दिल्ली पेटली आहे. संपूर्ण देश हे पहात आहे. सरकार यावर चर्चा करू इच्छित नाही.' याच मुद्द्यावर पुढे गोंधळ झाल्यानंतर सभापतींनी दुपारी 12 वाजेपर्यंत सभा तहकूब केली.