Delhi Violence: दंगेखोरांनी केली IB कॉन्स्टेबलची हत्या, नाल्यात फेकला मृतदेह

Delhi Violence: दंगेखोरांनी केली IB कॉन्स्टेबलची हत्या, नाल्यात फेकला मृतदेह

मंगळवारपासून शर्मा यांचे कुटुंबीय त्यांच्या शोधात होते. अंकित यांचे वडील रविंदर शर्मा हेही आयबीमध्ये हेड कॉन्स्टेबल आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी : ईशान्य दिल्लीतील हिंसाचारात दंगेखोरांनी आयबी कॉन्स्टेबलचा खून करून मृतदेह नाल्यात फेकल्याचं समोर आलं आहे. आयबी कॉन्स्टेबलचा मृतदेह चांद बाग पुलावरील नाल्यातून काढण्यात आला आहे. मृत अंकित शर्मा खजुरी इथे राहत होते. मंगळवारी संध्याकाळी ते ड्युटीवरून घरी परतत होते. चांद बाग पुलावर काही लोकांनी त्यांना घेरलं असा आरोप केला जात आहे. त्यांना मारहाण केली गेली आणि नंतर हत्या करून मृतदेह नाल्यात टाकण्यात आला.

मंगळवारपासून शर्मा यांचे कुटुंबीय त्यांच्या शोधात होते. अंकित यांचे वडील रविंदर शर्मा हेही आयबीमध्ये हेड कॉन्स्टेबल आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, अंकितलाही मारहाण करून गोळ्या घालण्यात आल्या आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी जीटीबी रुग्णालयात पाठविला आहे.

रविंदर शर्मा यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, अंकित हे 2017 मध्ये आयबीमध्ये भरती झाले होते. त्यांचा अद्याप विवाहदेखील झाला नसून स्थळ शोधण्याचं काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, शान्य दिल्लीत गेल्या चार दिवसात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) हिंसाचारात आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 56 पोलिसांसह 200 जण जखमी असल्याची माहिती आहे. विविध रुग्णालयांशी संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. गेल्या दोन दिवसांत 120 हून अधिक लोकांना उपचारासाठी वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

इतर बातम्या - भाजपला धक्का, फडणवीसांचे निकटवर्तीय खासदार राष्ट्रवादीच्या वाटेवर - सूत्र

एकीकडे तणावपूर्ण वातावरण असताना दुसरीकजे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हिंसाचारग्रस्त भागात सैन्य तैनात करण्याच्या मागणीवर गृह मंत्रालयाने 'सध्या सैन्य तैनात करण्याची गरज नाही' असं म्हटलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गृह मंत्रालयाने सांगितले की हिंसाचारग्रस्त भागात दिल्ली पोलिसांना आवश्यक प्रमाणात निमलष्करी दलांची सुरक्षा पुरविली गेली आहे.

दरम्यान, पोलिसांनी मंगळवारी भजनपुरा आणि खुरेजी खास भागात ध्वज मोर्चा काढला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीलमपूरमध्ये आता परिस्थिती सुधारत आहे. बुधवारी सायंकाळी साडेचार वाजेपासून हिंसाचाराची कोणतीही घटना घडलेली नाही. त्याचबरोबर पोलिसांनी बाबारपूर, जाफराबाद आणि गोकुळपुरी येथे वाहतूक बंद केली आहे.

इतर बातम्या - लग्नाच्या आनंदात पसरली शोककळा, भीषण अपघातामध्ये 18 वऱ्हाड्यांचा मृत्यू

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल (Ajit Doval) तणावाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी रात्री हिंसाचारग्रस्त भागात दाखल झाले. त्यांनी कारमध्ये बसून सीलमपूर, भजनपुरा, मौजपूर, यमुना विहार यासारख्या हिंसाचारग्रस्त भागातील परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर पोलीस आयुक्तांसह सीपी, डीसीपी यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली.

इतर बातम्या - बंदूकीच्या समोर उभ्या असलेल्या 'त्या' पोलीस अधिकाऱ्याच्या शौर्याला सलाम, म्हणाले...

First published: February 26, 2020, 2:14 PM IST
Tags: delhi news

ताज्या बातम्या