Home /News /news /

दिल्ली हिंसाचारप्रकरणी सुनावणी करणाऱ्या हायकोर्टातील जजची रातोरात बदली

दिल्ली हिंसाचारप्रकरणी सुनावणी करणाऱ्या हायकोर्टातील जजची रातोरात बदली

दिल्ली हिंसाचार: आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू; तणाव कायम, हायकोर्टात सुनावणी

    नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी : राजधानी दिल्लीत उसळलेल्या हिंसाचाराने आतापर्यंत 30 बळी घेतले आहेत. पोलिसांनी अटकसत्र सुरू केलं असून आतापर्यंत 106 जणांना अटक केली आहे. या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. भाजप नेत्यांच्या चिथावणीखोर वक्तव्यामुळे ही हिंसा झाल्याचं या याचिकेत म्हटलं आहे. या याचिकेवर सुनावणी करणाऱ्या न्यायाधिशांची रातोरात बदली करण्यात आली आहे. न्यायाधीश एस मुरलीधर हे या प्रकरणावर जज म्हणून सुनावणी करत होते. आज पोलीस आपली बाजू मांडणार आहेत. मात्र आजची सुनावणी होण्याआधीच मुरलीधर यांची रातोरात पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाचे जज म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अचानक न्या. मुरलीधर यांच्या झालेल्या बदलीमुळे चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे आज दिल्ली उच्च न्यायालयातील आजच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दिल्लीत दंगल भडकवल्याप्रकरणी 18 FIR दाखल करण्यात आले आहेत. या हिंसाचारात 56 पोलिसांसह 200 जण जखमी असल्याचं सांगितलं जात आहे. जखमींवर दिल्लीतील जीटीबी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अनेक ठिकाणी 144 कलम लागू करण्यात आलं आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दंगलग्रस्त ईशान्य दिल्लीत पाहणी केली. ही दंगल दिल्लीबाहेरच्या समाजकंटकांनी घडवल्याचं वक्तव्य केजरीवाल यांनी केलं आहे. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर 24 तासात चार बैठका घेतल्या आहेत. चौथ्या बैठकीदरम्यान मंगळवारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालही उपस्थित होते. दिल्लीतील विविध भागांमध्ये सुरक्षा दलागडून प्लॅग मार्च काढण्यात येत आले. या प्रकरणी आज पोलिसांना दुपारी 2.15 मिनिटांनी दिल्ली हिंसाचार प्रकरणी पोलिसांना उच्च न्यायालयात आज जबाब द्यायचा आहे. दिल्लीत नेत्यांनी केलेल्या भडकावू भाषणांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेसंदर्भात पोलिसांना त्यांची बाजू मांडण्यासाठी गुरुवारपर्यंतची मुदत देण्यात आली होती. चिथावणीखोर भाषणांमुळे ही हिंसा झाल्याचं या याचिकेत सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आज उच्च न्यायालय पोलिसांची बाजू ऐकून घेतल्यानंतर काय निर्णय देणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. दिल्लीत बोर्डाची परीक्षा पुढे CBSE परीक्षेचे काही पेपर बोर्डाने पुढे ढकलले आहेत. ईशान्य दिल्ली भागातल्या शाळांमध्ये बोर्डाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Amit Shah, PM Naredra Modi

    पुढील बातम्या