नवी दिल्ली, 05 मार्च : ईशान्य दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचारासंदर्भात (Delhi Violence) आणखी एक धक्कादायक व्हिडिओ(Video) समोर आला आहे ज्यामध्ये बेभान जमाव डीसीपीवर (DCP) दगडफेक करताना दिसत आहेत. या प्रकरणात आतापर्यंत 2 व्हिडिओ समोर आले आहेत, जे दिल्ली पोलिसांनीही खरे असल्याचं सांगितलं आहे. हे व्हिडिओ 24 फेब्रुवारी रोजीचे असल्याचं सांगण्यात येत आहे, ज्यात जमाव पोलिसांवर दगडफेक (Stone Pelting) करत आहे, तसंच हे व्हिडिओ दिल्लीतील चांदबाग (Chandbagh) भागातील असल्याची माहिती मिळत आहे.
दगडफेकीमुळे डिव्हायडरजवळ पडले डीसीपी
दिल्ली पोलिसांचे एसीपी अनुज यांनी सांगितलं की, 'ही घटना 24 तारखेची आहे जिथे वजीराबाद रोडवर अचानक जमाव आला. आम्ही कसेतरी खासगी मार्गाने यमुना विहारला गेलो. त्यावेळी डीसीपी बेशुद्ध अवस्थेत डिव्हायडरजवळ पडले होते.'
#Breaking-दिल्ली हिंसा का नया वीडियो, इसी हिंसा में घायल हुए थे DSP अमित शर्मा pic.twitter.com/huswnUyg6L
— News18 India (@News18India) March 5, 2020
#Breaking-दिल्ली हिंसा का नया वीडियो, न्यूज 18 से बात करते हुए ACP अनुज ने बताया कैसे उसने बेकाबू भीड़ से बचाई DSP की जान pic.twitter.com/DExLdJmtBP
— News18 India (@News18India) March 5, 2020
दगडफेकीनंतर सुरू झाला गोळीबार
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ 24 फेब्रुवारीचा आहे, जेव्हा चांदबाग जवळील दोन गटात भांडणं झाली. बातमी समजताच डीसीपी अमित शर्मा पथकांसह तिथे पोहोचले. मात्र, त्यानंतरच जमावाने पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरवात केली. पोलीस दगडफेक रोखण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगितलं जात आहे. दगडफेक इतकी वाढली की पोलिसांना माघार घ्यावी लागली. सतत दगडफेक करण्याबरोबरच गोळीबारही करण्यात आला होता. या व्हिडिओची गुन्हे शाखेची एसआयटी देखील तपास करत आहे, तर घटनास्थळी हजर असलेल्या सर्व पोलिसांची चौकशी करण्याच आली आहे. या जमावातील दरोडेखोरांनी रतन लालवर गोळीबार केल्याचा दावा केला आहे.
हे वाचा - दाभोलकरांच्या हत्या प्रकरणात नवं वळण, तब्बल 7 वर्षांनंतर समोर आला मोठा पुरावा
हिंसाचाराला जबाबदार कोण आहे?
दिल्ली हिंसाचाराबाबत अजूनही अनेक प्रश्नांची चौकशी सुरू आहे. मागील रविवारी ते बुधवार पर्यंत ईशान्य दिल्लीतील अनेक भाग जळून खाक झाले. हा सगळा कोणाचा कट होता? या प्रश्नांची उत्तरं तपासली जात आहेत. परंतु वास्तविकता अजूनही काही वेगळं शिजत असल्याचा पोलिसांचा संशय आहे. ईशान्य भागात हिंसाचारानंतर परिस्थिती सामान्य झाली आहे. बँका, रुग्णालयं आणि दुकानं उघडली आहेत. लोक पूर्वीप्रमाणे खरेदी करीत आहेत आणि रस्ताही मोकळा आहे.