नवी दिल्ली, 04 डिसेंबर : मंगळवारी पहाटे दिल्लीच्या(Delhi)रोहिणी (Rohini)भागात कारच्या आत रक्ताने माखलेले दोन मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कारमध्ये डॉक्टर आणि त्याच्या महिला मैत्रिणीचा मृतदेह आढळला. गोळी घालून या दोघांची हत्या करण्यात आली आहे. प्रशांत विहार पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला आहे. गाडीच्या आत परवानाधारक पिस्तूलही सापडली आहे. त्यावरून पोलीस पुढील तपास करत आहेत.
पोलिसांच्या प्राथमिक तपासणीत दोघांचा मृत्यू गोळी लागल्यामुळे झाला आहे. 62 वर्षीय मयत डॉक्टरचे नाव ओमप्रकाश कुकरेजा आहे. कारमधील दुसरा मृतदेह 55 वर्षीय सुदीप्ता दत्ता मुखर्जीचा आहे. सुदीप्ताचाही गोळी लागल्यामुळे मृत्यू झाला आहे. ओमप्रकाश यांच्या डोक्यावर गोळी झाडण्यात आली तर कारमध्ये मिळालेली पिस्तूल ही ओमप्रकाश यांचीच असल्याचं सांगण्यात येत आहे.
इतर बातम्या - छोट्या शहरांत कांदा स्वस्त मग मुंबईसह मोठ्या शहरांत भाव का गडाडले?
DCP Rohini, SD Mishra: Body of a man and a woman found in a car in Rohini, this morning. Prima facie it appears that the man shot the woman with his licensed revolver and later shot himself. Investigation underway. pic.twitter.com/rsEVnHaVQm
— ANI (@ANI) December 4, 2019
दोघांमध्ये होते प्रेमसंबंध
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहिणीमध्येच सुदीप्ता मुखर्जी यांचे निर्वाण नावाचे एक नर्सिंग होम आहे आणि ती त्यामध्ये एमडी होती. तर ओमप्रकाश कुकरेजा त्याच नर्सिंग होममध्ये डॉक्टर होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांचे प्रेमसंबंध होते. ज्यामध्ये सुदीप्ता मुखर्जी ओमप्रकाश यांच्यावर लग्नासाठी दबाव आणत होती, ज्याची त्यांना खूप चिंता होती. तर ओमप्रकाश कुकरेजा हे आधीच विवाहित असून यांच्या पत्नी दिव्यांग आहेत.
इतर बातम्या - हैदराबाद प्रकरण: आरोपीचा झाला होता प्रेम विवाह, पत्नी 7 महिन्याची गर्भवती
पोलिसांनी या सगळ्या माहितीच्या आधारे पुढील पोलीस तपास सुरू केला आहे. घनटास्थळावरून पोलिसांनी दोन मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. यावर आता पुढील तपास अवलंबून असणार आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये दिल्लीमध्ये आत्महत्या, हत्या, बलात्काराच्या घटना घडत असल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे.
व्हायरल बातमी - PUBG गेममुळे तरुणाच्या डोक्यावर परिणाम, व्यक्तीचं नाव ऐकून विश्वास बसणार नाही!