Buradi Case: भाटिया कुटुंबाला अज्ञात शक्तीने ग्रासलं होतं,महिला मांत्रिकाचा दावा

Buradi Case: भाटिया कुटुंबाला अज्ञात शक्तीने ग्रासलं होतं,महिला मांत्रिकाचा दावा

गीता पुढे म्हणते, या शनिवारी भाटिया कुटुंबातील लोकं भेटण्यासाठी येणारे होते. पण असं होऊ शकलं नाही. आमचं एका कुटुंबासारखं नातं होतं.

  • Share this:

दिल्ली,06 जुलै : बुराडीमध्ये एकाच कुटुंबामध्ये 11 जणांना हत्या केली होती. या प्रकरणाला आता नवीन वळण मिळालंय. न्यूज18 इंडियाने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये स्वत: मांत्रिक सांगणाऱ्या गीता नावाच्या महिलेला पोलिसांनी चौकशीला बोलावलंय. भाटिया कुटुंबासोबत गीता का भेटण्यासाठी गेली होती याचा शोध पोलीस घेत आहे. या कुटुबांसोबत आपले संबंध होते असा दावा गीताने केला होता. 30 जूनला बुराडीमध्ये भाटिया कुटुंबातील 11 जणांनी सामूहिक आत्महत्या केली होती.

न्यूज18 इंडियाच्या स्टिंग आॅपरेशनमध्ये एक महिला स्वत:ला गीता माँ म्हणून सांगतेय. मी कोणतेही आजार बरे करू शकते असा दावाच या गीता माँने केलाय. जेव्हा न्यूज18 च्या पत्रकाराने घरात एक जण आजारी असल्याचं सांगितलं तेव्हा गीता माँने हातात मोहरीचे दाणे ठेवले आणि भूतबाधा झाली असं सांगितलं. एवढंच नाहीतर गेल्या काही दिवसांपासून या आजारी व्यक्तीवर जिन्नची बाधा झालीये. त्यांना पांढऱ्या रंगाच्या वस्तू दूध, दही, भात देऊ नका. घरावर जाऊ देऊ नका तिथून त्यांना उडी मारावी वाटतेय असंही या गीता माँने सांगितलं.

गीता माँ

गीता माँ

Buradi Case: धक्कादायक व्हिडिओ समोर, आत्महत्येची मिळून करत होते तयारी

गीताचे वडिल कुंवरपाल सिंह यांनी भाटिया कुटुंबाचे घर बनवले होते. गीता ही भाटिया कुटुंबीयाच्या घरी गेली होती. पण तिची भेट ललित सोबत झाली नव्हती. तिने दावा केलाय की, भाटिया कुटुंब अडचणीत होतं. भाटियांच्या घरात जे 11 पाईप आणि 11 ग्रिलमध्ये जो आवाज होत आहे ती इमारत माझ्या वडिलांनी बनवली आहे. भाटियाचं कुटुंब तणावात होतं. कुठला तरी शक्ती त्यांच्यावर दबाव आणत होती.

Loading...

बुराडी प्रकरण : 11 पाईप, 11 दरवाजे 11 खिडक्या आणि 11 मृतदेह, काय आहे कनेक्शन ?

गीता पुढे म्हणते, या शनिवारी भाटिया कुटुंबातील लोकं भेटण्यासाठी येणारे होते. पण असं होऊ शकलं नाही. आमचं एका कुटुंबासारखं नातं होतं.

पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या चौकशीत भाटिया कुटुंबाने अंधश्रद्धतेून सामूहिक आत्महत्या केली. घरातला छोटा मुलगा ललित हा अंधश्रद्धेच्या आहारी गेला होता. मृत वडिल आपल्याशी बोलतात असा दावा त्याने केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 6, 2018 07:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...