दिल्लीच्या तख्तावर भाजप विराजमान, 'आप'चा सुपडा साफ

दिल्लीच्या तख्तावर भाजप विराजमान, 'आप'चा सुपडा साफ

दहा वर्षांपासून सत्तेत असलेला भाजप समोर आपली सत्ता कायम राखण्याचं आव्हान

  • Share this:

26 एप्रिल : दिल्लीतील तीन महानगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपानं तख्त राखत आम आदमी पार्टीचा सुपडा साफ केला आहे. तिन्ही महापालिकांमध्ये (दक्षिण दिल्ली, पूर्व दिल्ली, उत्तर दिल्ली) भाजपनं बहुमताचा आकडा पार केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा 'आप' पक्ष दुसऱ्या तर काँग्रेस तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे.

दिल्लीकरांनी 'आप'ला पार 'झाडू'न टाकत भाजपचं 'कमळ' फुलवलं आहे. एकूण 270 जागांपैकी भाजपने 185 जागांवर विजय मिळवला आहे. 'आप'ने तीन महापालिकांमध्ये मिळून 47 जागांवर विजय मिळवला. तर काँग्रेसला केवळ 26 जागांवर समाधान मानावं लागलं. सत्ताधारी आपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

भाजपा नेत्यांनी या शानदार विजयाचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांना देत दिल्लीवासियांचेही आभार मानले आहेत. या निकालांनंतर भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू झाला आहे. आपला विजय सुकमा नक्षलवादी हल्ल्यातील शहीद जवानांना अर्पण करत असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे.

तर, पराभवानंतर आम आदमी पार्टीने पुन्हा एकदा ईव्हीएमच्या मुद्द्यावरुन भाजपला लक्ष्य केलं. दिल्लीतील ही मोदी लाट नाही, तर ईव्हीएम लाट आहे, असा आरोप 'आप'ने केला.  त्यावर, 2015मध्ये याच ईव्हीएमद्वारे केजरीवाल निवडून आले होते, असा टोला भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी लगावलाय.

दुसरीकडे, काँग्रेसचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष अजय माकन यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला आहे. मात्र त्याचवेळी त्यांनी ईव्हीएम चौकशीची मागणीही केली केली.

First published: April 26, 2017, 8:49 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading