दिल्लीच्या मौजपूरमध्ये पुन्हा दगडफेक; पोलिसांनी केला लाठीचार्ज, तणावपूर्ण वातावरण

दिल्लीच्या मौजपूरमध्ये पुन्हा दगडफेक; पोलिसांनी केला लाठीचार्ज, तणावपूर्ण वातावरण

लोकांनी रस्ता रोखला आहे आणि माइकवरून जयश्रीरामच्या घोषणा दिल्या जात आहेत. तसेच मंगळवारपासून इथे दररोज हनुमान चालीसाचं पठण होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी : दिल्लीतील मौजपूरमधील वातावरण पुन्हा एखा तणावग्रस्त झाले आहे. थोड्या वेळा आधीच दगडफेक झाल्याची माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनी लाठीचार्ज केला असून घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रविवारी झालेल्या गदारोळानंतर सोमवारीदेखील निषेध सुरू आहे. नागरिकत्व सुधार अधिनियम (CAA) चे समर्थक आणि स्थानिक लोक मौजपुरमधील मंदिराशेजारी रस्त्यावर उतरले आहेत.

लोकांनी रस्ता रोखला आहे आणि माइकवरून जयश्रीरामच्या घोषणा दिल्या जात आहेत. तसेच मंगळवारपासून इथे दररोज हनुमान चालीसाचं पठण होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. झालेल्या दगडफेकीमध्ये कोणीही जखमी झालं नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

महिलांचाही आंदोलनात सहभाग

तणाव लक्षात घेता मौजपुरात भारी फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. निषेध करणारे लोक म्हणतात की, घटनेने आम्हालाही धरणं आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे जोपर्यंत शाहीनबाग, जाफराबाद, चांद बाग हा रस्ता रिकामा होणार नाही, तोपर्यंत मौजपूरहूनही रस्ता रिकामी होणार नाही. या आंदोलनात महिलाही सामील झाल्या आहेत. लाउडस्पीकरवर गाणी वाजवण्यात येत आहेत.

इतर बातम्या - मुलाने डोळ्यांदेखत पाहिले आईचे अनैतिक संबंध, नवऱ्याला कळायच्या आत असं संपवलं

पोलिसांनी 4 एफआयआर केल्या दाखल

दरम्यान, सीएएच्या विरोधात पोलिसांनी जाफराबाद, मौजपूर आणि दयालपूर येथे झालेल्या हिंसाचारात 4 एफआयआर नोंदवल्या आहेत. रविवारी विविध भागात झालेल्या हिंसक चकमकीत 10 पोलिसांसह एक नागरीक जखमी झाला. हिंसाचारानंतर संपूर्ण भागात पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

इतर बातम्या - 'आम्ही कराचीतल्या दर्ग्याबाहेर दाऊद इब्राहिमला ठार करण्यासाठी वाट बघत होतो, पण..

काय आहे संपूर्ण प्रकरण

रविवारी सीएएचे समर्थक आणि विरोधक पूर्वोत्तर दिल्लीतील मौजपूर, करावल नगरमध्ये एकमेकांशी भिडले आणि त्यानंतर मौजपूर, करावल नगरसह काही इतर भागात खडखडाट व जाळपोळ झाली. झाफराबादमधील मेट्रो स्थानकाखाली महिला अजूनही धरणावर बसल्या आहेत. सीएएच्या निषेधामुळे एकतर्फी रहदारी ठप्प झाली आहे. महिला म्हणतात की कायदा परत येईपर्यंत ते जाणार नाहीत. दरम्यान, मौजपूरकडे जाणारा रस्ता सीएए समर्थकांनी बंद केला असून रस्त्यावर बसून निषेध सुरू आहे.

इतर बातम्या - देशभरात NIAचे 20 ठिकाणी छापे, ISISचं रॅकेट उद्धवस्त

First published: February 24, 2020, 12:40 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading