दिल्ली, 12 फेब्रुवारी : महाराष्ट्र, झारखंडनंतर दिल्ली विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता पुढील एक वर्षात भाजपला बिहार आणि पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांचं आव्हान आहे. दिल्लीतील पराभवानंतर भाजप बिहारमध्ये JDU शी बोलणी करण्याच्या स्थितीत नाही. त्याचवेळी पश्चिम बंगालमध्येही पक्षाला स्थानिक नेता अद्याप सापडलेला नाही. या निकालानंतर भाजपचे मित्र पक्ष पक्षावरील दबाव वाढवतील, असं चित्र आहे.
बिहारमध्ये बहुधा यावर्षी ऑक्टोबरमध्ये आणि पुढच्या वर्षी पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. बिहारमध्ये पक्षाची योजना त्याच्या सहयोगी जेडीयूच्या बरोबरीने जागा घेण्याची होती. परंतु ताज्या निकालामुळे पक्षाला गोंधळ उडाला आहे. राज्यात पक्षाकडे बळकट नेता नसल्याने, भाजपवर दबाव येईल आणि विधानसभा निवडणुकीत सलग पराभवानंतर जेडीयूशी जास्त बोलण्याची स्थिती निर्माण होणार नाही. जेडीयू या निवडणुकीपूर्वी भाजपपेक्षा जास्त जागांची मागणी करत आहे.
पश्चिम बंगाल ममतांचे आव्हान
लोकसभा निवडणुकीत भाजपाने पश्चिम बंगालमध्ये उत्तम कामगिरी करून राजकीय पंडितांना चकित केले. त्यावेळी ब्रॅंड मोदीची जादू राज्यात होती. तथापि, स्थानिक ताकदवान नेत्यांशिवाय पक्ष आता राज्यात कार्य करत नाही. राज्यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या जवळपास कोणताही स्थानिक नेता नाही, ही पक्षाची अडचण आहे. सीएएच्या विरोधात अल्पसंख्याक वर्गाच्या बाजूने जमलेल्या संघटनेमुळे तृणमूल कॉंग्रेसची स्थिती मजबूत होऊ शकते. राज्यात अल्पसंख्याक मतदारांची संख्या 28 टक्के आहे.
आपुल्या घरात हाल सोसणार नाही मराठी! 'ठाकरे सरकार'ची मराठी भाषेबद्दल मोठी घोषणा
भाजपवर दबाव वाढला
अनेक राष्ट्रवादी मित्रपक्ष भाजपच्या राष्ट्रवादी अजेंड्यावर अस्वस्थ आहेत. विशेषतः जेडीयू, अकाली दल यांनी सीएए, एनआरसी, एनपीआरवर आक्षेप घेतला आहे. दिल्ली निकालानंतर आता पक्षांवर दबाव वाढत जाईल. झारखंड आणि महाराष्ट्र निकालानंतर मित्रपक्षांनी NDAच्या कार्यशैलीवर उघडपणे प्रश्न केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amit Shah