...आणि दिल्लीत 'विनाचालक' मेट्रो थेट गोडाऊनमध्येच आरपार घुसली !

नवी दिल्लीत विनाचालक मेट्रोचा चाचणीदरम्यान विचित्र अपघात झालाय. मेट्रोची चाचणी सुरू असताना ही विनाचालक मेट्रो भिंत तोडून एका गोडाऊन थेट आरपार घुसलीय. नवी दिल्लीतील कालिंदी कुंज डेपोजवळ ही ड्रायव्हरलेस मेट्रो ट्रॅकवरुन घसरली आणि भिंत तोडून आरपार गेली.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Dec 19, 2017 10:47 PM IST

...आणि दिल्लीत 'विनाचालक' मेट्रो थेट गोडाऊनमध्येच आरपार घुसली !

19 डिसेंबर, नवी दिल्ली : नवी दिल्लीत विनाचालक मेट्रोचा चाचणीदरम्यान विचित्र अपघात झालाय. मेट्रोची चाचणी सुरू असताना ही विनाचालक मेट्रो भिंत तोडून एका गोडाऊन थेट आरपार घुसलीय. नवी दिल्लीतील कालिंदी कुंज डेपोजवळ ही ड्रायव्हरलेस मेट्रो ट्रॅकवरुन घसरली आणि भिंत तोडून आरपार गेली. या अपघातात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

विशेष म्हणजे ही देशातली पहिली विनाचालक मेट्रो असणार आहे. येत्या 25 डिसेंबरला पंतप्रधानांच्या हस्ते या विनाचालक मेट्रोचं उद्घाटन होणार आहे. पण त्याआधीच चाचणीदरम्यान, तिचा हा असा विचित्र अपघात झाल्याने विनाचालक मेट्रोच्या प्रवासी सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेला आलाय. म्हणूनच दिल्ली मेट्रो व्यवस्थापनाने या अपघाताचे तातडीने चौकशीचे आदेश दिलेत.

ही मेट्रो चालवण्यासाठी बनवलेल्या प्रोग्रामिंगमधील मानवी चुकीमुळेच हा अपघात झाल्याचं बोललं जातंय. त्यामुळे या घटनेतील दोषींवर कठोर कारवाईचे संकेत मेट्रो प्रशासनाकडून देण्यात आलेत. गेल्या वर्षभरापासून या विनाचालक मेट्रोची सराव चाचणी सुरू आहे. ही विनाचालक मेट्रो दिल्लीतील बॉटनिकल गार्डन ते जनकपुरी पश्चिम या 12.64किलोमीटरच्या अंतरावर धावणार आहे.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 19, 2017 10:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...