IPL 2017 : दिल्लीचा पंजाबवर 51 रन्सने शानदार विजय

IPL 2017 : दिल्लीचा पंजाबवर 51 रन्सने शानदार विजय

  • Share this:

16 एप्रिल :  दिल्ली डेअरडेव्हिल्सनी त्यांच्या होमपीचवर म्हणजेच फिरोजशाह कोटला स्टेडियमवर किंग्ज इलेव्हन पंजाबचा 51 रन्सने पराभव केला आहे. दिल्ली डेअरडेविलनं पंजाबसमोर ठेवलेलं 189 रन्सचं आव्हान पंजाबला पेललं नाही आणि त्यांना 20 ओव्हर्समध्ये 9 विकेट्स गमावून 137 रन्स काढता आले.

मॅचमध्ये सुरुावातीला बॅटिंग करताना दिल्लीने 188 रन्सचा डोंगर उभारला. दिल्लीच्या पहिल्या दोन विकेट्स काहीशा झटपट गेल्या पण नंतर ख्रिस माॅरिस आणि कोरी अँडरसनने केलेल्या फटकेबाजीमुळे दिल्लीच्या डावाला आकार आला, विशेषत: शेवटच्या दोन ओव्हर्समध्ये दिल्लीच्या बॅट्समननी केलेल्या तुफान फोडाफोडीमुळे दिल्लीला 6 विकेट्सच्या मोबदल्यात 188 रन्सची मजल मारता आली. ट्वेंटी-ट्वेंटीमध्ये कुठल्याही टीमसाठी ही धावसंख्या मोठीच आहे.

तर 188 चा पाठलाग करताना किंग्स इलेव्हन पंजाबची दमछाक झाली. टप्प्याटप्प्याने त्यांच्या विकेट्स पडत गेल्या.  या सामन्यात पंजाबकडून केवळ अक्षर पटेलला चांगली खेळी करता आली. त्यानं 27 बॉल्समध्ये 44 रन्स काढले आणि तो नाबाद राहिला. दिल्लीकडून ख्रिस मॉरीसनं शानदार बॉलिंग करत तीन विकेट्स घेतल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 16, 2017 12:12 PM IST

ताज्या बातम्या