मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

शहरात चोरी, गावात दानधर्म! ‘रॉबीनहूड’ ला पोलिसांनी केली अटक

शहरात चोरी, गावात दानधर्म! ‘रॉबीनहूड’ ला पोलिसांनी केली अटक

लॉकडाऊनमध्ये बाहेर फिरणाऱ्यांना पोलिसांनी घडवली अद्दल.

लॉकडाऊनमध्ये बाहेर फिरणाऱ्यांना पोलिसांनी घडवली अद्दल.

इराफान आणि त्याचे साथीदार दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यातील घरांमध्ये चोरी करत होते. या चोरीच्या पैशातून इराफान गावात दानधर्म करत असे.

  • Published by:  News18 Desk

दिल्ली, 10 जानेवारी : श्रीमंतांच्या तिजोरीवर डल्ला मारुन ते पैसे गरिबांना वाटणाऱ्या चोराला ‘रॉबिनहूड’ असं संबोधून त्याचं उदात्तीकरण साहित्यामधून करण्यात आलं आहे. सिनेमांमध्येही या प्रकारचं पात्र अनेकदा आढळतं. या सर्व गोष्टी काल्पनिक कथेमध्ये रम्य वाटत असल्या तरी प्रत्यक्ष समाजव्यवस्थेत त्यांची अंतिम जागा ही जेल असते. दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) अशाच एका ‘रॉबिनहूड’ (Robinhood) चोराला बेड्या ठोकल्या आहेत.

काय आहे प्रकरण?

दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचच्या डेप्यूटी कमिशनर मोनिका भारद्वाज यांनी दिलेल्या माहितीनुसार या चोराचं नाव मोहम्मद इरफान उर्फ रॉबिनहूड उजाले आहे. त्याच्याकडून दोन महागड्या कार जप्त करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर त्याच्या जबानीवरुन पंजाबमधील त्याच्या तीन साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे.

काय होती पार्श्वभूमी?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ इराफान आणि त्याचे साथीदार दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यातील घरांमध्ये चोरी करत होते. इराफनला महागाड्या कारचा नाद होता. त्यानं जुन्या कारची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याकडून 18 लाखांची जग्वार आणि 10 लाखांची निसान कार खरेदी केली होती. त्याचबरोबर त्यानं चोरीच्या पैशांमध्ये नुकतीच एक स्कॉर्पियो कार खरेदी केली होती. इराफननं ऑगस्ट महिन्यात पंजाबमधील जालंधरमध्ये एका घरावर दरोडा टाकून 26 लाखांची रोकड आणि दागिने चोरले होते.

गावात दानशूर म्हणून ओळख

इराफान बिहारमधील सीतामढी या गावात भरपूर दानधर्म करत असे. त्यामुळे तो गावकऱ्यांमध्ये ‘रॉबिनहूड’ म्हणून प्रसिद्ध होता. ‘त्यानं अनेक आरोग्य शिबिरांचं गावात आयोजन केलं होतं. गावातील एका कुटुंबाला मुलीच्या लग्नासाठी त्यानं पाच लाखांची मदत केली होती.’ असं पोलिसांनी सांगितलं.

गावातील लोकप्रियतेचा फायदा घेत या वर्षी जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याची तयारी देखील त्यानं सुरु केली होती. इराफानला यापूर्वी 2017 साली देखील अटक करण्यात आली होती, अशी माहिती आता समोर आली आहे.

First published:

Tags: Crime, Delhi