मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /'मी कपडे विकतो तुमच्या कुटुंबासारखं देशाला नाही विकत'

'मी कपडे विकतो तुमच्या कुटुंबासारखं देशाला नाही विकत'

प्रियांकांनी एका मागोमाग एक दोन ट्विट केले. पहिल्या ट्विटमध्ये त्यांनी अहमदाबादमधील महात्मा गांधी यांच्या साबरमती आश्रमाबद्दल लिहिलं आहे. तर दुसऱ्या ट्विटमध्ये महात्मा गांधींचा विचार शेअर केला की, राष्ट्रपिता नेहमीच हिंसेच्या विरोधात होते.

प्रियांकांनी एका मागोमाग एक दोन ट्विट केले. पहिल्या ट्विटमध्ये त्यांनी अहमदाबादमधील महात्मा गांधी यांच्या साबरमती आश्रमाबद्दल लिहिलं आहे. तर दुसऱ्या ट्विटमध्ये महात्मा गांधींचा विचार शेअर केला की, राष्ट्रपिता नेहमीच हिंसेच्या विरोधात होते.

प्रियांका गांधींच्या ट्वीटला भाजप नेते तेजिंदर पाल बग्गा यांचे प्रत्युत्तर

    नवी दिल्ली, 25 मार्च : काँग्रेसच्या महासटचिव प्रियांका गांधी यांच्यावर दिल्लीचे भाजप नेते तेजिंदर पाल बग्गा यांनी जोरदार टीका केली आहे. प्रियांका गांधींनी साधलेल्या निशाण्यानंतर बग्गा यांनी उत्तर दिलं आहे.

    बग्गा म्हणाले की, 'हो, मी कपडे विकतो, कष्टाने पैसे कमावतो. तुमच्या आईसारखं देशाला नाही विकत. तुमच्या पतीसारखा जमिनिवर ताबा नाही घेत आणि तुमच्या भावाप्रमाणे भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात जामिनावर नाही.

    प्रियांका गांधी यांनी बग्गा यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, उत्तर प्रदेशातील शिक्षणमित्रांच्या कष्टाचा अपमान केला जात आहे. शेकडो पीडितांनी आत्महत्या केल्या. जे न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरले त्यांना काठीने मारहाण केली गेली. इतकं सगळं होत असताना भाजप नेते मात्र टीशर्टच्या मार्केटिंगमध्ये गुंतले आहेत. त्यांनी थोडंस महत्त्वाच्या प्रश्नांकडेही लक्ष द्यायला हवं.

    उत्तर प्रदेश दौऱ्यावर असलेल्या प्रियांका गांधींनी 'साची बात' मोहिम सुरु केली आहे. यात त्यांनी शेतकरी, कामगार वर्गातील लोकांना भेटून प्रत्यक्ष चर्चा केली. त्यांचे प्रश्न आणि समस्या प्रियांका गांधी यांनी ट्वीटरवरून मांडले आहेत. यातच त्यांनी शिक्षणमित्रांचा अपमान होत असल्याचे ट्वीट प्रियांका गांधींनी केले होते. त्यावर भाजप नेते तेजिंदर पाल बग्गा यांनी प्रत्युत्तर दिलं.

    VIDEO: जेव्हा शरद पवारांनी उदयनराजेंची कॉलर उडवली...!

    First published:

    Tags: BJP, Congress, Loksabha election 2019, Priyanka gandhi