मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /दिल्ली विधानसभा भाजपने घेतली मनावर, केजरीवालांना चितपट करण्यासाठी आखला मास्टर प्लान

दिल्ली विधानसभा भाजपने घेतली मनावर, केजरीवालांना चितपट करण्यासाठी आखला मास्टर प्लान

या सभांमध्ये 200 हून अधिक लोक उपस्थित राहू नये, असेही पक्षाने म्हटलं आहे. नेत्यांची भेट घेण्यासाठी आणि बैठका आयोजित करण्यासाठी भाजप यावेळी रोस्टरची तयारी करत आहे.

या सभांमध्ये 200 हून अधिक लोक उपस्थित राहू नये, असेही पक्षाने म्हटलं आहे. नेत्यांची भेट घेण्यासाठी आणि बैठका आयोजित करण्यासाठी भाजप यावेळी रोस्टरची तयारी करत आहे.

या सभांमध्ये 200 हून अधिक लोक उपस्थित राहू नये, असेही पक्षाने म्हटलं आहे. नेत्यांची भेट घेण्यासाठी आणि बैठका आयोजित करण्यासाठी भाजप यावेळी रोस्टरची तयारी करत आहे.

नवी दिल्ली, 19 जानेवारी : सगळ्यात मोठा पक्ष असतानाही भाजपला अनेक राज्यांमध्ये मोठा फटका बसला. पण त्यानंतर आता दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने (BJP) मोठा रणनीती आखली आहे. या निवडणुकीचं सोनं करत दिल्लीत पुन्हा सत्ता आणण्यासाठी भाजप आता खास प्लान तयार करत आहे. यासाठी भाजपने निवडणूक प्रचारावर सगळ्यात जास्त जोर दिला आहे. 100 पेक्षा जास्त नेत्यांना प्रचार रॅलीमध्ये उतरवण्यात येणार आहे.

पक्षाच्या बैठकीमध्ये दिल्ली निवडणुकांवर जोरदार चर्चा झाली. यानुसार पक्ष राज्यात निवडणूक प्रचारादरम्यान, 5 हजारांपेक्षा जास्त सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीत दररोज 250 किंवा अधिक सभा घेण्याचं पक्षाचं लक्ष्य आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने ही खास रणनीतीही तयार केली आहे. त्याअंतर्गत, मागील वेळेप्रमाणे या वेळेस पक्ष मोठ्या बैठका घेण्याच्या बाजूने नाही. या मोठ्या मेळाव्यांऐवजी पक्षाने आपल्या नेत्यांना छोट्या सभा आयोजित करण्यास सांगितलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे 10 मोर्चे आणि रॅली

या सभांमध्ये 200 हून अधिक लोक उपस्थित राहू नये, असेही पक्षाने म्हटलं आहे. नेत्यांची भेट घेण्यासाठी आणि बैठका आयोजित करण्यासाठी भाजप यावेळी रोस्टरची तयारी करत आहे. दिल्ली भाजपने पंतप्रधान मोदींना निवडणूक प्रचारादरम्यान 10 मोर्चा काढण्याची विनंती केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान कार्यालयाकडून आतापर्यंत तीन मोर्चाला मान्यता देण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांआधी भाजपने दिल्ली निवडणुकांसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती. पक्षाने विधानसभेसाठी एकूण 70 जागांपैकी सध्या 57 जागांवर उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यावेळी उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी भाजपने जुन्या, विश्वासू आणि बड्या नेत्यांवर भर दिला आहे.

इतर बातम्या - Mumbai Marathon 2020 : कडाक्याच्या थंडीत 17 व्या टाटा मॅरेथॉनला सुरुवात

सर्वात प्रतिष्ठित नवी दिल्ली विधानसभा

यामध्ये दिल्लीच्या सर्वात प्रतिष्ठित नवी दिल्ली विधानसभा जागेवर उमेदवाराचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. परंतु, या 57 नावांपैकी एकही नाव मुख्यमंत्रीपदाचे दावेदार मानले जाऊ शकत नाही. शुक्रवारी दिल्ली निवडणूक प्रभारी प्रकाश जावडेकर यांच्यासह प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी ही नावं जाहीर केली. त्यापैकी 11 उमेदवार एससी / एसटी आहेत तर चार महिलांनाही तिकीट देण्यात आलं आहे. इतकंच नव्हे तर आम आदमी पार्टीमध्ये असलेले कपिल मिश्रा आणि काँग्रेसमधील सुरेंद्रसिंग बिट्टू यांच्यासारख्या पक्ष बदलणाऱ्यांची नावंही या यादीत आहेत.

इतर बातम्या - साई बाबांचा जन्मस्थान वाद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोडवणार, शिर्डीत आजही बंद

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचं राजकीय भवितव्य ठरवणार

नवी दिल्ली आणि कृष्णा नगरमधील अरविंद केजरीवाल यांच्या जागेवरुन भाजपने कोणतेही उमेदवार उभा केलेला नाही. कृष्णा नगरची जागा केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांचा बालेकिल्ला आहे. पण 2015 मध्ये भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार किरण बेदी या निवडणुकीत पराभूत झाल्या. या दोन्ही जागांवर भाजप मोठे चेहरे उभे करण्याची शक्यता आहे.

नवी दिल्लीच्या जागेबद्दल चर्चा करायची तर ही निवडणूक मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचं राजकीय भवितव्य ठरवणार आहे. 2013मध्ये केजरीवाल यांनी इथे विजेंद्र गुप्ता आणि शीला दीक्षित यांचा पराभव केला होता. यानंतर 2015 च्या विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांनी भाजप प्रवक्ते नुपूर शर्मा यांचा पराभव केला. कृष्णा नगर जागेबद्दल बोलायचं तर हर्षवर्धन हे या जागेवरून 5 वेळी आमदार राहिले होते. 2013 च्या निवडणुकीत ते भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार होते. 2015च्या निवडणुकीत भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असलेल्या किरण बेदी इथून निवडणूक हरल्या होत्या. आम आदमी पक्षाचे नेते एसके. बग्गा यांनी त्यांचा पराभव केला होता.

इतर बातम्या - IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध निर्णायक लढतीत भारताची डोकेदुखी वाढणार?

First published:
top videos

    Tags: BJP, Congress, Delhi assembly election, Election 2019, Maharashtra Assembly Election 2019