S M L

दिल्लीत दाट धुक्यामुळे कार अपघातात 4 राष्ट्रीय खेळाडूंचा मृत्यू

राजधानी दिल्लीत दाट धुक्यामुळे एका कार अपघातात चार राष्ट्रीय खेळाडूंचा जागीच मृत्यू झालाय. तर दोघेजन गंभीर जखमी झालेत. हे सर्वजण पॉवर लिफ्टर होते. दिल्ली-चंदीगड महामार्गावरील सिंधू बॉर्डर येथे हा अपघात झाला.

Chandrakant Funde | Updated On: Jan 7, 2018 10:42 AM IST

दिल्लीत दाट धुक्यामुळे कार अपघातात 4 राष्ट्रीय खेळाडूंचा मृत्यू

07 जानेवारी, नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत दाट धुक्यामुळे एका कार अपघातात चार राष्ट्रीय खेळाडूंचा जागीच मृत्यू झालाय. तर दोघेजन गंभीर जखमी झालेत. हे सर्वजण पॉवर लिफ्टर होते. दिल्ली-चंदीगड महामार्गावरील सिंधू बॉर्डर येथे हा अपघात झाला. दाट धुक्यामुळे चालकाला रस्त्याचा अंदाज आला नाही आणि त्याचे कारवरील नियंत्रण सुटून कारची डिव्हायडर आणि खांबाला धडक बसली. त्यामुळे चार खेळाडूंचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे जण गंभीर जखमी झाले.

उत्तर भारतामध्ये थंडीचा जोर वाढला आहे. त्याबरोबरच दाट धुकेही पडत आहे. रस्त्यांवर प्रचंड धुके असल्याने वाहने पुढे सरकण्यात अडथळे निर्माण होत आहे. परिणामी दिल्ली, उत्तर प्रदेश तसेच हरयाणा व पंजाबमध्ये वाहतूक मंद गतीने सुरू आहे. तसेच अनेक ठिकाणी वाहतूककोंडी निर्माण होत आहे.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 7, 2018 10:39 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close