Delhi Election 2020: मतदानाच्या टक्केवारीवरून केजरीवालांनी घातला गोंधळ

Delhi Election 2020: मतदानाच्या टक्केवारीवरून केजरीवालांनी घातला गोंधळ

आदमी पक्षाने (AAP) निवडणूक आयोगावर घणाघाती आरोप केले आहेत. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतरही निवडणूक आयोगाने मतदानाची टक्केवारी जाहीर केली नसल्याचे सांगत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हल्लाबोल केला.

  • Share this:

नवी दिल्ली,9 फेब्रुवारी: दिल्ली विधानसभेच्या (Delhi Assembly Election 2020) 70 जागांसाठी शनिवारी मतदान झाले. परंतु मतदानाच्या टक्केवारीवरून आम आदमी पक्षाने (AAP) निवडणूक आयोगावर घणाघाती आरोप केले आहेत. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतरही निवडणूक आयोगाने मतदानाची टक्केवारी जाहीर केली नसल्याचे सांगत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हल्लाबोल केला. आता निवडणूक आयोगाने मतदानाची टक्केवारी जाहीर करून या वादाला पूर्णविराम दिला आहे.

निवडणूक आयोगाने रविवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन दिल्ली विधानसभेसाठी शनिवारी झालेल्या मतदानाची टक्केवारी जाहीर केली. दिल्लीकरांनी 62.59 टक्के मतदान केल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीच्या तुलने ही टक्केवारी 2 टक्क्यांनी जास्त आहे.

निवडणूक आयोगाने स्पष्ट केले की, दिल्‍लीतील काही मतदार संघात शनिवारी रात्रीपर्यंत मतदान सुरू होते. रात्री उशीरापर्यंत मतदानाची टक्केवारी गोळा करण्याचे काम सुरु होते. सर्वाधिक 71.6 टक्के मतदान बल्लीमारान विधानसभा मतदार संघात झाले तर सर्वात कमी 45.4 टक्के मतदान दिल्ली छावनीमध्ये झाल्याची माहिती आयोगाने दिली.

केजरीवालांनी उपस्थित केला होता सवाल..

दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच आम आदमी पक्षाने निवडणूक आयोगावर (election commission) गंभीर आरोप केले. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतरही निवडणूक आयोगाने मतदानाची टक्केवारी जाहीर केली नाही. शनिवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत 57.06 टक्के मतदान झाल्याचे तर रात्री 10.30 वाजता 61.46% मतदान झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, एक फायनल फिगर समोर आली नाही. नंतर केजरीवाल यांनी ट्वीट करत, मतदान प्रकिया पार पडल्यानंतर खूप उशीर झाला तरी मतदानाची फायनल टक्केवारी निवडणूक आयोगाने जाहीर केली नाही. निवडणूक आयोग करतोय तरी काय? असा सवाल उपस्थित केला होता.

दिल्लीत तिरंगी लढत...

दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी शनिवारी मतदान झाले. दिल्लीत आम आदमी पक्ष, काँग्रेस आणि भाजपमध्ये तिरंगी लढत आहे. अनेक राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत भाजपचा सुपडा साफ झाल्यानंतर आता आणखी एक राज्य भाजपच्या हातून निसटणार की भाजप आपलं कमळ राजधानी दिल्लीत फुलवण्यात यशस्वी होणार, हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे भाजपसाठी ही सर्वात महत्त्वाची निवडणूक मानली जात आहे. तर दुसरीकडे आपचं सरकार येणार असल्याचा कौल नवी दिल्लीतील जनतेनं दिली आहे. घोडा मैदान लांब नाही, अवघ्या 3 दिवसांत म्हणजेच 11 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.

मोदी-शहा मॅजिकचा धुव्वा उडवत दिल्लीत पुन्हा केजरीवाल!

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी (Delhi Exit Poll Results 2020 Live updates ) आज मतदान पार पडलं. या निवडणुकीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टी आणि केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपमध्ये जोरदार घमासान सुरू आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याची देशभरात उत्सुकता आहे. मतदान पूर्ण झाल्यानंतर आलेल्या काही संस्थांच्या एक्झिट पोल्सने दिल्लीत पुन्हा एकदा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आपचं सरकार स्थापन होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे.

दिल्ली विधानसभेच्या 70 पैकी आम आदमी पार्टीला 49 ते 63 जागा, भाजपला 5 ते 19 जागा तर काँग्रेसला 0 ते 4 जागा मिळतील, असा अंदाज एबीपी आणि सी व्होटरचा एक्झिट पोल सांगतो.

'टाइम्स नाऊ'च्या एक्झिट पोलनुसार दिल्लीत 'आप'ला 44 जागा तर भाजप 26 जागा मिळतील, मात्र काँग्रेसला भोपळा फोडता येणार नाही.

'रिपब्लिक'च्या एक्झिट पोलनुसार दिल्लीत कोण मारणार बाजी?

AAP : 48-61

BJP : 9-21

CONG : 0-1

Newsx- Neta चा एक्झिट पोल काय सांगतो?

AAP: 50-56

BJP: 10-14

Congress: 0

2015 साली झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात आम आदमी पार्टीने भाजप आणि काँग्रेसचा अक्षरश: धुव्वा उडवला होता. या निवडणुकीत 'आप'ला दिल्लीत 70 पैकी तब्बल 67 जागा जिंकल्या होत्या. यावेळी भाजपच्या खात्यात अवघ्या 3 जागा जमा झाल्या, तर कधीकाळी दिल्लीत निर्विवाद वर्चस्व असणाऱ्या काँग्रेसला भोपळाही फोडता आला नव्हता.

First published: February 9, 2020, 8:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading