मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

Smartphone मध्ये हे Apps असल्यास लगेच करा डिलीट, नाहीतर दर महिना बसेल 3 हजारांचा फटका

Smartphone मध्ये हे Apps असल्यास लगेच करा डिलीट, नाहीतर दर महिना बसेल 3 हजारांचा फटका

सायबर सिक्योरिटी सॉफ्टवेअर प्रोव्हाइडर Avast ने प्रीमियम SMS फ्रॉड स्किममध्ये 151 Android Apps असल्याचं नुकतंच सांगितलं होतं. यात कस्टम किबोर्ड, QR कोड स्कॅनर, व्हिडीओ आणि फोटो एडिटिंग प्रोग्राम, कॉल ब्लॉक आणि गेमसह अनेक Apps सामिल होते.

पुढे वाचा ...
  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर : ऑनलाइन फ्रॉडमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. धोकादायक Malware Apps द्वारे अनेकांची फसवणूक केली जाते. Apple आणि Google वेळोवेळी आपल्या युजर्सला मालवेअर असलेल्या फ्रॉड Apps पासून सावध राहण्याचं तसंच ते डिलीट करण्यासाठी अलर्ट करत असतात. युजरपर्यंत अलर्ट पोहोचल्यानंतरही हे धोकादायक Apps आपलं नाव बदलून फ्रॉड करतात. आता पुन्हा एकदा अशाच धोकादायक Apps बाबत युजर्सला अलर्ट करण्यात आलं आहे.

सायबर सिक्योरिटी सॉफ्टवेअर प्रोव्हाइडर Avast ने प्रीमियम SMS फ्रॉड स्किममध्ये 151 Android Apps असल्याचं नुकतंच सांगितलं होतं. UltimaSMS स्कॅम कँपेनमध्ये युजर्सला SMS सर्विससाठी एनरोलमेंट करण्यासाठी फेक अँड्रॉइड App चा वापर केला जात होता.

जगभरात 80 हून अधिक देशात आतापर्यंत 1 कोटीहून अधिक स्मार्टफोन युजर्सने 151 फ्रॉड Apps डाउनलोड केले होते. यात कस्टम किबोर्ड, QR कोड स्कॅनर, व्हिडीओ आणि फोटो एडिटिंग प्रोग्राम, कॉल ब्लॉक आणि गेमसह अनेक Apps सामिल होते. हे Apps डाउनलोड केल्यानंतर एरिया कोड, भाषा, फोन लोकेशन, IMEI नंबर आणि फोन नंबर वेरिफिकेशन सामिल आहे.

आपण कोणतंही App डाउनलोड करताना त्यासाठी मोबाइल नंबर किंवा Email ID मागितला जातो. याचाच फायदा फ्रॉड उचलतात आणि युजरच्या परवानगीशिवाय या डिटेल्सचा वापर प्रीमियम SMS सर्विससाठी साइन-अप करण्यासाठी करण्यात आला. या प्रकारचा चार्ज जवळपास 40 डॉलर म्हणजेच जवळपास 3 हजार रुपये प्रति महिना असतो.

Alert! Google ने Play Store वर बॅन केले 136 धोकादायक Apps; लगेच करा डिलीट, इथे तपासा संपूर्ण लिस्ट

युजरसोबत हा फ्रॉड केल्यानंतर डाउनलोड केलेलं App काम करणं बंद करतं आणि नवा सब्सक्रिप्शन पर्याय दिला जातो. जर एखाद्या युजरने हे अनइन्स्टॉल केलं, तर त्यांच्याकडून मेंबरशीप फी घेतली जाईल, ज्यासाठी आधी साइन-अप केलं गेलं होतं.

Avast ने याबाबत रिपोर्ट जारी केला आहे. या रिपोर्टमध्ये 151 Apps आहेत, जे फ्रॉडचा भाग आहेत. अनेक युजर्सने आता हे Apps अनइन्स्टॉल केले आहेत. तुमच्याकडेही असे Apps असल्यास लगेच डिलीट करा. तसंच ज्यावेळी चार्ज विचारला जातो, त्यावेळी बँकेचं डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड तपासणं गरजेचं आहे.

First published:

Tags: Google, Tech news