Elec-widget

दिपिका पदुकोणही आता 'मादाम तुसाँ'मध्ये

दिपिका पदुकोणही आता 'मादाम तुसाँ'मध्ये

अभिनेत्री दिपीका पदुकोनचा मेणाचा पुतळा आता लंडनच्या विख्यात मादाम तुसाँ संग्रहालयात ठेवण्यात येणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 जुलै : अभिनेत्री दिपिका पदुकोणचा मेणाचा पुतळा आता लंडनच्या विख्यात मादाम तुसाँ संग्रहालयात ठेवण्यात येणार आहे. लहानपणी आई-वडिलांसोबत जे संग्रहालय पाहिलं त्यात आपला पुतळा बसविण्यात येणार असल्यानं मी खूप उत्साहित आहे अशी प्रतिक्रिया दिपीकाने व्यक्त केलीय. या पुतळ्याच्या कामासाठी संग्रहालयाच्या एका टीमने दिपिकाची लंडनमध्ये नुकतीच भेट घेतली. त्यावेळी दिपिकाची 200 मापं घेण्यात आलं. आणि खास फोटोशुटही करण्यात आलं. पुतळा हुबेहूब बनवण्यासाठी अशा प्रकारे अत्यंत काटेकोरपणे त्या व्यक्तिचा अभ्यास करून हे पुतळे बनविण्यात येतात. त्यामुळे या संग्रहालयाची किर्ती जगभर पसरली आहे.

पद्ममावत हा दिपिकाचा चित्रपट वादामुळे प्रचंड गाजला होता. लवकरच तिचा शहारूखबरोबर झीरो हा चित्रपट येतोय. पुढच्या वर्षी दिपिकाच्या या पुतळ्याचं काम होणार असून नंतर तो लंडन आणि दिल्लीतल्या संग्रहालयात ठेवण्यात येणार आहे. या संग्रहालयात चित्रपट अभिनेते, राजकारणी, समाजकारणी, शास्त्रज्ञ अशा प्रसिद्ध लोकांचे मेनाचे पुतळे या संग्रहालयात बसवले जातात. ते इतके हुबेहूब असतात की त्या दोन व्यक्ती शेजारी उभ्या राहिल्या तर पुतळा आणि व्यक्तीला ओळखतानाही गोंधळात पडावं एवढा त्यात सारखेपणा असतो.

Loading...

 

हेही वाचा...

मराठा आंदोलन : नदीत उडी घेतलेल्या आंदोलकाचा मृत्यू

जमावाकडून होणाऱ्या हत्येंविरोधात केंद्र करणार कायदा

राहुल गांधी हे 'नफरत के सौदागर', पीयुष गोयल यांचा पलटवार

शाहू महाराज यांना ‘भारतरत्न’ द्या - धनंजय महाडिक

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 23, 2018 07:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com