नवी दिल्ली, २२ एप्रिल- बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा आगामी छपाक सिनेमाचं सध्या चित्रीकरण सुरू आहे. दररोज या सिनेमाशी निगडीत अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. नुकताच या सिनेमाचा अजून एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात दीपिका अभिनेता विक्रांत मेसीला किस करताना दिसत आहे.
किसिंग सीन शूट करतानाचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. घराच्या गच्चीवर हे शूट सुरू होतं. सिनेमाचं सध्या आऊट डोअर शूट सुरू असल्यामुळे चित्रीकरण पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली दिसते. त्यांच्यातीलच एकाने हा व्हिडीओ शूट करून तो इंटरनेटवर व्हायरल केला.
आसपासच्या घरांवर लोक उभं राहून सिनेमाचं चित्रीकरण पाहताना या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, जसं सीनचं शूट सुरू होतं तिथे उभे असलेले सर्व किसिंग सीन पाहून आरडा ओरडा करायला लागतात.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दीपिकाने पांढऱ्या रंगाचा सूट आणि गुलाबी रंगाची ओढणी घातलेली दिसते. किसिंग सीनच्या या व्हिडीओआधी अजून एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यात दीपिका शाळेच्या कपड्यांमध्ये दिसत होती. सध्या या सिनेमाचं चित्रीकरण दिल्लीत सुरू आहे.
मेघना गुलझार दिग्दर्शित हा सिनेमा पुढच्या वर्षी २०२० मध्ये प्रदर्शित होत आहे. सिनेमाच्या पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून दररोज या सिनेमाच्या चर्चा होताना दिसतात. दीपिका यात असिड हल्ल्यातील एका पीडितेची भूमिका साकारत आहे. या सिनेमाच्या माध्यमातून दीपिका निर्मिती क्षेत्रातही पदार्पण करत आहे.