राणेंना घेण्याअगोदर भाजपने त्यांचं 'रेकॉर्ड' तपासावं- केसरकर

राणेंना घेण्याअगोदर भाजपने त्यांचं 'रेकॉर्ड' तपासावं- केसरकर

राणेंना पक्षात घेण्याअगोदर स्वच्छ कारभाराच्या बाता मारणाऱ्या भाजपने त्याचं 'रेकॉर्ड'ही तपासावं, असा टोमणा शिवसेनेचे राज्यमंत्री आणि सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी लगावलाय.

  • Share this:

मुंबई, 22ऑगस्ट : नारायण राणेंच्या बहुचर्चित भाजप प्रवेशावर त्यांचे तळकोकणातले राजकीय प्रतिस्पर्धी दीपक केसरकर यांनी शेलक्या भाषेत टीका केलीय. भाजपने त्यांच्या पक्षात कुणाला घ्यायचं आणि कुणालाही नाही, हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. पण राणेंना पक्षात घेण्याअगोदर स्वच्छ कारभाराच्या बाता मारणाऱ्या भाजपने त्याचं 'रेकॉर्ड'ही तपासावं, असा टोमणा शिवसेनेचे राज्यमंत्री आणि सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी लगावलाय.

केसरकर पुढे म्हणाले, 'तुम्ही ज्यांना घेताय. त्यांच्यावर किती केसेस आहेत. मुलांवर किती केसेस आहेत. कुठल्या चौकशा सुरू आहेत हे जरा तपासावे, पारदर्शी कारभाराचा आग्रह धरणारे ते पाळतील अशी आशा करूया '

नारायण राणेंच्या कोकणातील राजकीय ताकत किती हेही भाजपने तपासून पाहण्याचा सल्ला केसरकरांनी दिलाय. राणेंकडे कोकणात 1 आमदार आहे, त्यामुळे त्यांना प्रवेश देताना त्यांचा फायदा किती आणि तोटा किती हेही त्या - त्या पक्षाने तपासलं पाहिजे असंही केसरकरांनी म्हटलंय. राणेंचं तळकोकणातलं राजकीय साम्राज्य मोडीत काढण्यात दीपक केसरकरांनी मोठा पुढाकार घेतला होता. त्यामुळे राणेंच्या संभाव्य भाजप प्रवेशाबाबत केसरकरांची ही प्रतिक्रिया खूप काही सांगून जाते. थोडक्यात राणे भाजपात गेल्यास सेना-भाजप युतीमध्येही तणाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

First published: August 22, 2017, 10:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading