धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी सजणार

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी सजणार

हजारोंच्या संख्येनं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी दीक्षाभूमीवर दरवर्षी जमतात. यावर्षीही हजारोंच्या संख्येने ते जमले आहेत. माणसामाणसातील उचित व्यवहाराचं आचरणशील प्रतीक मानलं जाणाऱ्या पंचशील ध्वजांनी अवघी दीक्षाभूमी सजली आहे

  • Share this:

नागपूर,30 सप्टेंबर: आज 61 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन. आजच्या दिवशी दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी नागपुरच्या दीक्षाभूमीत आवर्जुन उपस्थित असतात. याच दिवशी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती.

हजारोंच्या संख्येनं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी दीक्षाभूमीवर दरवर्षी जमतात. यावर्षीही हजारोंच्या संख्येने ते जमले आहेत. माणसामाणसातील उचित व्यवहाराचं आचरणशील प्रतीक मानलं जाणाऱ्या पंचशील ध्वजांनी अवघी दीक्षाभूमी सजली आहे.दीक्षाभूमीवर आंबेडकरांनी लाखो अनुयायांना मनगटात आत्मविश्वास आणि संघर्षाचा मंत्र दिला म्हणुन या जागेला 'दीक्षा'भूमी म्हटलं जातं. गौतम बुद्ध यांनी दिलल्या पंचशीलेला अनुसरून असलेला हा पंचशील ध्वज स्तुपाकडे जाण्याच्या मार्गावर, स्तुपाच्या सभोवताल व परिसरात जागोजागी उभारले जात आहेत.

First published: September 30, 2017, 10:15 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading