मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

'मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा', स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

'मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा', स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली.

  • Published by:  Kranti Kanetkar
बीड, 15 ऑक्टोबर : राज्यात बुधवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. बीड जिल्ह्यात हातातोंडाशी आलेल्या खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र प्रशासनाकडून अद्याप पंचनामे करण्यात आले नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली. बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली. स्वाभिमानीच्या महिला प्रदेशाध्यक्षा पूजा मोरे यांच्या नेतृत्वात गेवराई येथे शेतकऱ्याच्या बांधावरून मुख्यमंत्र्यांना जागे करण्यासाठी "मुख्यमंत्री जागे व्हा" अश्या घोषणा देण्यात आल्या. हे वाचा-पावसाचं धुमशान, अर्ध पुणे पाण्याखाली; काळजात धडकी भरवणारे पाहा 5 VIDEO तिकडे पुण्यात लोहगाव भागात पार्किंगमध्ये वाहनं बुडाली मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं तर दुसरीकडे चंदननगर पोलीस ठाण्यात पाणी घुसलं आहे. दत्तवाडी भागात घरांमध्ये पाणी घुसल्यानं नागरिकांचे हाल झाले तर दगडूशेठ गणपती मंदिर परिसरातही पुराचं पाणी आलं. मनमाड, नांदगाव,येवला भागात पाऊस सुरू आहे. वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. कोल्हापूर धरणक्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून राधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडले आहेत. पंचगंगा नदीची पाणीपातळी 20 फुटांवर गेली आहे तर जिल्ह्यातील आठ बंधारे पाण्याखाली गेल्यानं मोठं नुकसान झालं आहे.
First published:

Tags: Beed

पुढील बातम्या