राज ठाकरेंसमोरच मनसे नेत्यांमध्ये खडाजंगी

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 27, 2018 10:20 PM IST

राज ठाकरेंसमोरच मनसे नेत्यांमध्ये खडाजंगी

मुंबई, 27 जून : मनसेच्या कोअर कमिटीची बैठक वादळी ठरली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमोरच मनसे नेते बाळा नांदगावकर आणि सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यात वाद झाला. अमित ठाकरे यांना राजकारणात आणा अशी मागणी नेत्यांनी केली.

लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत पराभूत झालेल्या मनसेनं नव्याने सुरुवात केली खरी पण पक्षाला गळती सुरूच आहे. 2019 च्या निवडणुका लक्षात घेता राज ठाकरे यांनी पक्षांची मोर्चेबांधणी सुरू केली. आज राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत मनसेच्या ध्येय धोरणात पक्षाचे नेते संपुर्ण ताकदीने उतरत नाहीत. त्यामुळे पक्षाची ध्येय धोरणं लोकांपर्यंत पोहचत नाही अशी वादाची प्रमुख कारणं ठरली.

नाणार प्रकल्पावरून सेना आक्रमक,उद्धव ठाकरेंनी धर्मेंद्र प्रधानांची भेट नाकारली

राज ठाकरे यांच्यासमोरच मनसे नेत्यांवर सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सडकून टीका केली.  पक्ष कार्यालयात सकारात्मक ऊर्जा नाही, ते बदला. आपले नेते सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असले पाहिजे. नाशिकमध्ये पक्षाने एवढं चांगलं काम केलं तरी नगरसेवक आपल्याला सोडून गेले.  पण ते का गेले, याचा खुलासा लोकांपुढे कधीच झाला नाही. आपण आपल्या यशस्वी आंदोलनाचं मार्केटिंग का केलं नाही ? असा सवाल देशपांडेंनी केला.

तर बाळा नांदगावकर यांनी जे पक्ष सोडून जातायत त्यांना आपण का थांबवलं नाही. ते थांबवण्यासाठी आपण काय करतोय. पक्षात महिलांना स्थान किती ?, आपण शेतकऱ्यांसाठी काय करतोय. जर असाच गोंधळ सुरू राहिला तर नेतेपदाचा राजीनामा देतो असा इशाराच नांदगावकर यांनी दिला.

Loading...

तर राज ठाकरे यांनी तुम्ही मराठीच्या मुद्यावरून भरकटलाय. प्रवक्ते म्हणून तुम्ही पत्रकार परिषद का घेत नाही. भाजप सोशल मीडियावर कोट्यवधी खर्च करतोय पण आपण का करत नाही असे सवाल राज ठाकरेंनी उपस्थितीत केले.

1) अमित राज ठाकरे यांच्यावर पक्षाची युवा संघटनांची जबाबदारी द्यावी.

2) येणाऱ्या निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी नवीन राजकीय धोरण ठरवणं आवश्यक आहे.

3) पक्षाची महिला सेना कार्यक्षम नसल्याचीही चर्चा झाली.

4) नाशिक मधील पराभवाचं कारण म्हणजे लोकांपर्यत मनसेची भूमिकाच पोहचली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 27, 2018 09:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...